Thursday, 25 September 2025

Not incident.. but the person..?


Some days in life return to us, not with events, but with faces. I may not recall the exact events, but I remember the people: who they were to me then, and who they are today & Vice-versa. These faces, once so familiar, whisper questions to my heart. Why do such drastic shifts occur in life? Why do relationships/friendships change beyond recognition?

Perhaps life places certain people in our path for a reason. Maybe they are meant to teach us something, to leave behind lessons rather than permanence. Yet, the mind refuses to settle. It keeps questioning, restless and fearful, knowing that there is no way back. Once a bond is altered, it rarely returns to what it was.

Today, my mind reminds me of this truth again and again. Perhaps this is the reason we fear death. After all, death too is an irreversible state. We fear it because we cannot return, cannot speak again, cannot feel again what once made life so meaningful.

And yet, despite knowing this truth, what does a restless soul do? He scrolls through old messages, hoping to see a familiar name light up again. He waits for a call that may never come. With this quiet longing, he goes to bed.

Tomorrow, as always, life will move forward. I will go to work, meet new people, face new moments. Somewhere, I will search for the same old warmth in new faces. Somewhere, unconsciously, I will seek the faces of the past in the people I meet. Somewhere, I will try not to repeat the mistakes of yesterday. 

And in this endless cycle of memory and renewal, Life never allows us to go back. But it always leaves us with longing. And in that longing, perhaps lies the most human part of us—the ability to feel deeply, to hope endlessly, and to carry love even when it has turned into memory.

Maybe this is what growth really means. It is not about restoring what has been lost, but about accepting that loss as part of our journey. It is not about pretending we don’t long for what once was, but about learning to live with that longing without letting it stop us. Life keeps changing, and so do we.

But even Though.. It's not Incident ... It's Person... I remember the most...😊

Sunday, 9 March 2025

राजुरा गावातील सर्व सुजाण नागरिकांनो हे सार्वजनिक पत्र तुमच्यासाठी...

माझ्या गावातील, राजुरा नगरीतील सर्व सुजाण नागरिकांनो हे सार्वजनिक पत्र मी तुमच्यासाठी लिहीत आहे, गावच्या आरोग्याचा प्रश्न आहे नक्की वाचा आणि योग्य ठिकाणी हे पत्र पोहोचवा ...


सप्रेम नमस्कार, विनंती विशेष;

काही दिवसांपूर्वी तब्बेत ठीक नव्हती म्हणून गावाकडे आलो होतो. आणि पाहिल की माझ्या घरासमोरून जाणार मुख्य रस्ता (गावातील मुख्य रस्ता) हा पूर्णपणे खणून ठेवला आहे..  का..? कारण दुरुस्ती करण्यासाठी.. दुरुस्ती कधी होणार आहे .. माहिती नाही.. 

त्याच रस्त्यावरून दिवसरात्र 24 तास , मोठे हायवे(खाली त्या गाडीचे फोटो जोडला आहे) काळी माती वाहून नेत आहेत. आणि रस्ता ठीक नसल्यामुळे रस्त्यावरील संपूर्ण धूळ आजुबाजुच्या घरामध्ये जात आहे, ही परिस्थिति संपूर्ण गावामधून जाणाऱ्या 2 किमी अंतराच्या रस्त्यावर आहे. पण याची दाखल घ्यायला कोणीही तयार नाही .. 

याच रस्त्याच्या बाजूला जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे, ज्यामध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे लहान मुले शिक्षणासाठी जातात; याच रस्त्याच्या बाजूला सरकारी आरोग्य केंद्र म्हणजेच दवाखाना आहे, ज्यात रुग्ण आपल्या तपासणीसाठी, आपल आरोग्य ठीक करण्यासाठी जातात ; पुढे गेल्यानंतर गावातील मुख्य कॉलेज देखील याच रस्त्यावर आहे. 


तसेच, गावातील मुख्य दुकाने आणि हॉटेल याच रस्त्याच्या दुतर्फा आहेत. याच रस्त्याच्या दुतर्फा गावातील जवळपास 40 % जनता वास्तव्य करते. गावातील लहान लेकर याच रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या अंगणात, मैदानात खेळतात; खूप सारे आजी आजोबा देखील त्यांच म्हातारपण याच रस्त्याच्या बाजूला घालवत आहेत ते देखील आजारी असू शकतात; काही माता-भगिनी गरोदर देखील असू शकतात;  हाच मुख्य रस्ता असल्यामुळे गावातील पदयात्री पण याचाच उपयोग पायवाट म्हणून देखील करतात.  त्यामुळे भरधाव काळी माती घेऊन चालणाऱ्या या हायवा मुळे हवेत उडणाऱ्या धुळीच्या कणांचा  परिणाम या सर्वांच्या आरोग्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वरूपात होत आहे. गावातील झाडे , प्राणिमात्रांवर देखील याचा परिणाम होत आहे. पण याबद्दल कोणीही पुढे होऊन बोलायला तयार नाही. हे धुळीचे कण 24 तास हवेत उडत आहेत. ते इतके जास्त आहेत की प्रत्यक्ष डोळ्यानं पाहता येत आहेत, इतकंच काय तर एखादा अंधव्यक्ति देखील सांगू शकेल की हा धुळीचा परिसर आहे. रात्री झोपेत श्वसनामध्ये जाणवतील इतके जास्त ते धुळीचे कण आहेत.. आणि हे सर्व 24 तास चालू आहे ते पण गावातील मुख्य रस्त्यावर ...


मी याबद्दल गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तींना बोलण्याचा प्रयत्न देखील केलो पण कुठूनही हवा तसा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाहीये. 


मी मान्य करतो की कुठलातरी विकास करण्यासाठी ही काळी माती मोठ्या हायवे गाडयानी वाहून नेली जात असेल, पण कुठलातरी विकास हा कुठल्यातरी लोकांच्या आरोग्याला दुर्लक्षित करून करणे हे योग्य आहे का.. ? कोणताही विकास हा त्या परिसरातील लोकांच्या आरोग्याच्या मोबदल्यात मिळणार असेल तर हा विकास खरंच हवा आहे का  ..?  आणि कुणाला ?


गावातील सुजाण नागरिकांनो , आपण फक्त गावची जत्रा, किंवा जयंती साजरी करण्यासाठी किंवा गावातील मतदानाच्या दिवशीच एकत्रीत यायच काय ..? मग गावात समस्या निर्माण झाल्यावर कोण एकत्रीत येणार ..? याबद्दल कोण बोलणार ..? विचार करा. 


जिथे समस्या आहे तिथे उपाय देखील असतोच, मी केलेल्या विचारानुसार पुढील उपाय मला सोईस्कर वाटतात.. फक्त अमलबजावणी कोण करणार हे मी माझ्या प्रिय गावकऱ्यावर सोडतो.. 


* रस्ता लगेच दुरुस्त करणे शक्य नसेल तर - प्रत्येक 2 ते 3 तासानंतर त्या 2 किमी रस्त्यावर टॅंकरणे पानी शिंपडावे आणि गावाजवळ आल्यानंतर मोठ्या गाड्यांचा वेग प्रती तास 5 किमी पेक्षाही कमी असावा,

* गाडी पूर्ण मातीने न भरता थोडीशी कमी भरावी म्हणजे वेगात ती रस्त्यावर सांडणार नाही अन धुळीचे कण हवेत उडणार नाहीत.

* यापेक्षाही उत्तम उपाय आपल्याकडे असतील तर त्याचा वापर करावा पण हे होणारे वायूचे प्रदूषण टाळावे. 


मी आज आपल्या गावातून माझ्या नोकरीच्या गावी जात आहे, पण अपेक्षा करतो की माझ हे पत्र योग्य व्यक्तिपर्यंत/ साहेबापर्यंत  पोहोचेल आणि लवकरात लवकर योग्य ते उपाय यावर केला जाईल. 


अपेक्षित,


यशवंत 


(आपल्या गावावर प्रेम करणारा एक युवक)


धन्यवाद .. (खूपच दुखीकष्टी मनाने)














Friday, 13 September 2024

Saturday, 23 December 2023

मैत्रीचे पत्र 2

 प्रिय,

     रोहित ... पाटील (आदरयुक्त बिलकुल नाही)

कॉलेज च्या शेवटच्या दिवसांमध्ये आपण रोज सकाळी १५ ते २० मिनिट कॉलेज ला लवकर पोहोचायचो आणि कॉलेज समोरच्या टिशॉपवर (चहाची टपरी) चहा पियायचो. एका दिवशी तू पैसे भरायचास; दुसऱ्या दिवशी मी आणि ज्या दिवशी दोघांकडेही पैशाची टंचाई असायची तेंव्हा कसेबसे करून दोघांत एक चहा घ्यायचो... वन बाय टू... आणि दररोज त्याच टिशॉप समोरच्या SP बिर्याणी हाऊस च्या मोठयाशा पाठीकडे बघत - " आपण यामध्ये बिर्याणी कधी खायची " याचा प्लान करायचो. हा आपला रोज सकाळच्या दिनक्रमाचा मुख्य भाग असायचा. 

एके दिवशी ठरलेल्या प्लान नुसार आपण परीक्षा सुरू होण्याच्या एक दिवस आधी तिथे बिर्याणी खाण्यासाठी जाणार होतो. पण आपल्याला वाटल की परीक्षेचा अभ्यास खूप पेंडिंग आहे... मग ठरल की GEOGRAPHY चा पेपर ज्या दिवशी आहे; त्या दिवशी जाऊया कारण त्याच्या दोन दिवसानंतर ECONOMY चा पेपर होता... पण नंतर दोघांच्याही लक्षात आल की जशी आपल्याकडे पैशांची टंचाई आहे तशीच ECONOMICS च्या CONCEPTS ची... त्यामुळे दोन दिवसांत CONCEPTS ची भरपाई करण अशक्य वाटत होत; म्हणून त्यादिवशीचाही प्लान CANCEL झाला. 

परीक्षेच्याच कालावधीत तुझा MPSC STI PRELIMS चा  RESULT आला आणि तू PRELIMS CLEAR केला... MPSC ची PRELIMS CLEAR केला भाई तू... आणि तेही पहिल्याच प्रयत्नात... CONGRATULATIONS भाई..!!! THIRD  YEAR च्या शेवटच्या SEMESTER चे पेपर लिहीत असताना तू   MPSC PRE CLEAR केला भाई... अदभूत !!! मग आपल त्याच दिवशी ठरल की तुला किंवा मला ज्या दिवशी JOB लागेल त्या दिवशी आपण SP ची बिर्याणी खायची... भाई, एक गोष्ट सांगू... माझ अंतर्मन सांगतय की आता आपण लवकरच SP ची बिर्याणी खाणार आहोत...

भाई, पण ती बिर्याणी व्हेज आहे की नॉनव्हेज? नाहीतर परत प्लान चेंज करावा लागेल!!! मग आपल्याला परत त्याच टिशॉपवर चहा पित विचार करावा लागेल... मला तर चालेल...

भाई, आज तुझा जन्मदिवस, त्यानिमित्तानेच हे पत्र आणि आठवण. HAPPY BIRTHDAY BHAI...✨✨✨

तेरे सारे गुन्हे माफ भाई... 

तेरी सारी रजाएँ मंजूर भाई... 

भाई ए जिंदगी बहोत  छोटी है, अगले जनम मेभी तेरी दोस्ती मुझे कबूल भाई...

                                                  कल जैसे, मुझे; आज और फिर कल भी  संभाल लेणा भाई...  


                                  जन्मदिवसाच्या मनापासून शुभेच्छा भाई... ✨✨✨ 

Sunday, 17 December 2023

मैत्रीचे पत्र - १

 प्रिय,

      गंगाधर.. गंगा... गंग्या... पाटील... 

पाटील, तुम्हाला महिती आहे का ... मी दिवाळीपेक्षा आपल्या  गावच्या जत्रेची जास्त आतुरतेने वाट पाहत असतो.  ते पहिल्या दिवशीच जागरण-गोंधळ , ती खंडेरायाची पालखी , त्या गावाबाहेरच्या कुस्त्या आणि आपली यारी-दोस्ती... हे सर्व माझ्या आवडीचे अमूल्य क्षण एकदाच जुळवून आणणार सण म्हणजे आपल्या गावची जत्रा... दत्त जयंतीचा कालावधी... माझ्या आयुष्यात; जेंव्हापासून मला समजायला लागल तेंव्हापासून आतापर्यंत फक्त एकदाच आपल्या गावच्या जत्रेला येऊ शकलो नाही. पण; पाटील... यानंतर मी  नेहमी हजर राहील बरका... आपल्या जत्रेमध्ये. 

जागरणाच्या रात्री, चहा पुरवण्याच काम आमच्याकडे तर पालखी ओढण्याचा विशेष मान तुमच्याकडे; कुस्त्याच्या दिवशी तुमचा जंगी सामना इतर प्रतिस्पर्धकांसोबत तर तुम्ही कुस्ती जिंकावी म्हणून माझी धाकधूक माझ्या मनासोबत; असो. कुस्त्या पाहायला मलादेखील आवडतात पण तासाभरापेक्षा जास्तवेळ मी मैदानावर नाही थांबू शकत, कारण त्याच कालावधीत मला नेमून दिलेल्या इतर कामांमुळे... पण मैदानावर त्या कालावधीत काय घडतंय याची खबर मला असते बरका. 

आकाशी पाळणे, मंदिरासमोरची खेळभांड्याची अन प्रसादाची दुकाने, सुशोभित मंदिरे, गावातील जुनी दुकाने नवीन रूपात रूपांतरित, बेकायदेशीर झेंडी, तितली हे कायदेशीर जागेत एकदम इमानदारीने चालणारे अस्थायी खेळ; गावात जत्रेसाठी येणाऱ्या नवीन भाविकांची गर्दी, यांमुळे संपूर्ण गाव एकदम खुलून येत. 



पाटील, आपण गावाबाहेर कुठेही काहीही कारणांमुळे कितीही वेळ राहिलो ना , तरीही गावात जो आनंद, सुख, समाधान, शांती मिळते ना ती गावाबाहेर कुठेच नाही... आपण गावामध्ये कोणत्याही गल्लीत कधीही जाउद्या... त्या गल्लीतील, त्या वाड्यातील सर्व माणसे आपलीच वाटतात... कारण / आणि तीही तितकीच चांगली वर्तणूक (वागणूक) आपल्या सोबत करतात... गावात फिरताना नेहमी आपलेपनाची भावना कायम मनात राहते... पण गावाबाहेर आल्यानंतर परकेपणाची भावना आपोआप मनात जागा निर्माण करते, पण... जेंव्हा कोणीतरी आपलस वाटणार गावाबाहेर भेटत ना... तेंव्हा होणार आनंद गगनात मावेनासाच... आणि हं... पाटील... अशी माणसे गावाबाहेरही भेटतात बरका..!! जग खूप सुंदर आहे... पाटील... आता बघा ना... तुमची आणि माझी मैत्री गावातल्या पेक्षा गावाबाहेरच खूप प्रसिद्ध आहे. आपली ओळख जितकी गावामध्ये होती... त्यापेक्षा अधिक गावाबाहेर असतानाच झाली, नाही का..? आपली भेट जितकी गावात असताना होते त्यापेक्षा कैकपटीने अधिक बाहेरगावी असतानाच.

पाटील; एक गोष्ट सांगू... गावाबाहेर असताना अशीच आपलेपणाची भावना निर्माण करणारा अजून एक मित्र मला मिळाला... माझा अजून एक मित्र बनला... तोही एकदम तुमच्यासारखाच आहे... मी तुमच्याकडून मस्ती करायला शिकलो तर त्याच्याकडून जिवंतपणे जीवन जगायला शिकलो. अशी मैत्री करून ती टिकवण्यासाठी हे आयुष्य खूप छोटस आहे. यानंतरच पत्र मी त्यालाच लिहिणार आहे. असो. विषय खूप भरकटतोय..!!

पाटील, दिनांक २४ ते २८ डिसेंबर आपल्या गावची जत्रा आहे, त्याची आठवण करून देण्यासाठीच हे पत्र.  आणि यावेळेसची आपल्या जत्रेची विशेषतः म्हणजे - श्री संत बाळूमामा यांची मूर्ती स्थापना आणि मंदिर कलशारोहनाचा कार्यक्रम दिनांक २५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता संपन्न होणार आहे. एक नवीन दैविरुप संत नेहमीसाठी आपल्या गावात स्थानापन्न होणार आहेत. यावेळेस गावात आनंदच आनंद असणार. त्यामुळे मी पण येणार आहे तुम्ही पण या आणि वाचक मित्रहो तुम्ही पण यायच बरका... 


मग, 

         माझ्या गावच्या जत्रेला यायच,

         खंडेरायाच्या पालखीच दर्शन घ्यायच,

         संत बाळूमामाचा आशीर्वाद घ्यायचा,

         दत्त मंदिरात जेवण करायच,

         जंगी कुस्त्या पहायच्या,

        आणि जत्रेचा आनंद घ्यायचा बरका.       




सर्व मैत्रीचे पत्र 

धडपड

 

   

Thursday, 4 November 2021

बातें (Thoughts)

 








जब वापस आऊँगा... तब बहोत लिखूंगा...

इतना लिखूंगा की तुम थक जाओगे पढ़ते पढ़ते...

ना बस्स पढ़ते पढ़ते... समझते समझते भी...


बाते ही कुछ इतनी उलझन भरी है; की

उलझनों की तरह लिखना पढ़ता है उन्हें...

समझमे तो मुझे भी कुछ नहीं आती... इसलिए,

इस बार लिख कर समझना चाहता हूं, मैं उन्हें...


लिख कर समझना चाहता हूं मैं उन्हें...

✍️✍️✍️ Ingale Yashavant



Thursday, 16 September 2021

जिंदगी (Life)

 

जिंदगी एक सीधा रास्ता नही है। जिंदगी एक पहेली की तरह है। जिंदगी में हर तरफ गड़बड़ (confusion) है और हर रास्ता हमे एक जगह लाके छोड़ता है। मगर हमे लगता है हम सीधे आगे बढ़ रहे है। असल में हम बस इधर उधर भटकते रहते है। बस भटकते ही तो रहते है...


देखिए ना,
कितना अच्छा होता अगर सब कुछ सहज होता... कितना अच्छा होता अगर सब कुछ हमारे नियंत्रण में होता ...अगर ऐसा होता तो शायद कुछ और समय हम सूरज (Sun) को रोक पाते... कितना अच्छा होता...

जिंदगी एक उलझन की तरह है , हर मोड़ पे एक नई पहेली हमे सुलझानी पढ़ती है... कभी कभी सबकुछ सुलझा हुआ लगता है मगर अचानक से कोई बदलाव आ जाता है... नियम और कठिन बन जाते है... अप्रत्यक्ष नही बल्कि प्रत्यक्ष रूप से बहोत सारे साहसों से लड़ना पढ़ता है... और बहुतांश बार अपने आपसे लड़ना पढ़ता है... सुख और दुःख ; जिंदगी के दो पहियों की तरह है कभी पिछला पहिया आगे तो कभी आगे का पीछे चलता ही रहता है...

आप जिंदगी का साथ दो या ना दो पर जिंदगी आपको साथ लेके समय के चक्र में आगे बढ़ती ही रहती है...

कितनी अजीब , साहसी और रोमांचकारी है न यह जिंदगी...!!!

✍️✍️✍️ Ingale Yashavant.

Sunday, 31 January 2021

हास्य : एक स्वानुभव

काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. पुण्यातील लक्ष्मी रोड जवळच्या मेसवर; मी आणि माझा मित्र सिद्धार्थ जेवणासाठी गेलो होतो. त्या दिवशी आम्हाला खूप भूक लागली होती आणि मेसवर जाण्यासाठी देखील खूप उशीर झाला होता जवळपास रात्रीचे नऊ-साडेनऊ वाजले असतील. त्यामुळे, आम्हाला लवकर जेवण करून रूमला जायचं होत.

आम्ही दोघे मित्र जेवणासाठी बसलो; ताट आल आणि खूप भूक लागल्यामुळे एकदम वेगात जेवण करू लागलो. 

एक व्यक्ती खूप वेळेपासून आमच्या समोरच्या खुर्चीवर बसला होता,त्याच्यासमोर अजून जेवणाच ताट आल नव्हत. तो माझ्याकडे पाहून  दोन-तीन वेळेस हसला. पण मला खूपच भूक लागल्यामुळे मी थोडस त्याच्याकडे दुर्लक्ष करून जेवण करू लागलो. 

मी त्याच्याकडे पाहून हसत नसल्यामुळे; तो मला बोलला "तू MPSC करतो का?" 

मी थोडस दुर्लक्ष केल्यासारखं उत्तरलो "नाही, मी फक्त विचार करतोय"
.
.
"पण तुम्हाला अस का वाटल?" जेवणाचा वेग कमी करत थोडस आश्चर्यानेच विचारलो.

"तुझे कपडे पाहून;
खूपच फॉर्मल दिसतोस त्याबरोबरच टिका (अष्टगंध) वैगेरे लावून काही मॅटर(Matter) आहे का..." तो एकदम फ्रीली बोलून गेला.

मी देखील थोडस फ्री झालो आणि बोलून टाकलो "काही मॅटर होऊ नये म्हणूनच तर फॉर्मल घालतो"

मग काय हास्याचा कल्लोळच...!!! 

"तू काही काळजी करू नको, MPSC वाले कोणाकडे लक्ष देतच नाहीत आणि दिलं तरीही त्यांच्या डोक्यात MPSC च असते" तो क्षणात उत्तरला.

मग काय हास्यच हास्य, आनंदच आनंद...

मग असाच काहीसा हास्यमय संवाद आमच्यात पुढचे काही मिनिटे चालू होता... मेस मध्ये फक्त आम्ही तिघेच हसत होतो.

मग आमचं जेवण झाल आणि आम्ही( मी आणि सिद्धार्थ) निघालो. तोपर्यंत त्याच्यासमोर जेवणाचा ताट आल होत.

त्याच नाव प्रशांत होत. त्यानंतर आम्ही कधीही भेटलो नाही.
-----------------------------------------------
आजदेखील सेम टू सेम प्रसंग घडला. थोड्याशा वैयक्तीक कारणामुळे चिंतेत होतो. रूमकडे जाण्यासाठी बस स्टॉपला येऊन थांबलो होतो, पण खूप वेळ झाला तरीही बस आली नव्हती. त्यामुळे एक रिक्षा आला त्यात बसलो.

ते रिक्षावाले काका खूपच टेंशन मध्ये दिसत होते. मी त्यांच्या लगतच बसलो होतो त्यामुळे ते मला म्हणाले "आज सकाळपासून फिर-फिर फिरलो पण एक देखील भाड लागलं नाही. सकाळपासून फक्त 350 रुपयेच जमले" 

मी माझ्या मनातली काळजी थोडीशी बाजूला ठेवून, त्यांना फ्रिली बोललो.

मग काय माझा स्टॉप येईपर्यंत मी पण आनंदात आणि रिक्षावाले काका पण आनंदात...
थोड्या वेळासाठी दोघेही आपापल्या मनातली काळजी विसरलो.
-----------------------------------------------

अशा प्रसंगातून मी काय शिकलो-

काही व्यक्ती आपल्या आयुष्यात खूपच क्षणिक कालावधीसाठी अवतरतात आणि खूप सारा आनंद देऊन जातात; ज्याच्याविषयी आपण कधी विचारही केलेला नसतो.

अनेक वेळेस असही होत की कोणीतरी आपल्याला आनंद देण्याचा प्रयत्न करत असतो पण तो आपण स्विकारतच नाही; आपण आपल्याच ATTITUDE, EGO, चिंता, काळजी... यामध्ये अडकून पडलेलो असतो.या सर्वांतून आपण बाहेर पडायला पाहिजे - जगाला काहीतरी दिलं पाहिजे, जगाकडून काहीतरी घेतल पाहिजे, शिकल पाहिजे.

खूप वेळेस आपलं आयुष्य मोठमोठ्या दुःखाने,संकटाने भरल्यासारखं वाटत; अशा वेळेस आयुष्याचा कंटाळाही यायला लागतो, त्रास व्हायला लागतो. पण हे सर्व विचार बाजूला ठेवून त्या प्रसंगाना, संकटांना बदलण्यासाठी स्वतःला आव्हान केलं पाहिजे, स्वतःत प्रेरणा निर्माण केली पाहिजे.

मग राहणार ना नेहमी आनंदात?
------------------------------------------------
विचारमालेविषयी अधिक जाणून घ्या:- विचारमाला

Friday, 6 November 2020

TO THE POINT...

THIS ARTICLE IS BEING WRITTEN ON THE OCCASION OF DIPAWALI. 

HAPPY DIPAWALI IN ADVANCE💐💐.

HI FRIENDS, WE ALL ARE EDUCATED; YOU ARE READING THIS ARTICLE MEANS YOU ARE ALSO AN EDUCATED GUY. SO, WE KNOW WHAT IS RIGHT AND WHAT IS WRONG, DON'T WE?

ARE YOU GOING TO BUY FIRECRACKERS?JUST WAIT 2 MINUTES, READ THIS SHORT ARTICLE AND GO OUT. 

DO YOU KNOW WHAT ARE THE BAD EFFECTS OF FIRECRACKERS? DO YOU REALLY WANT TO BUY FIRECRACKERS AND DIE AT EARLY? NOW YOU MAY ASK ME WHY ARE YOU ASKING SUCH QUESTION TO US?
UNEXPECTED ENVIRONMENTAL CHANGES ARE HARMFUL FOR US. A MICRO CORONA VIRUS CAN PROHIBIT US FROM COMING OUT OF HOME THEN THINK WHAT WILL HAPPEN WHEN WHOLE ENVIRONMENT WILL CHANGE.

AS WE KNOW THAT IF WE CONSERVE NATURE , IT WILL CONSERVE US. DURING THE CORONA LOCKDOWN THE POLLUTION HAS DECREASED IN GREAT EXTENT. NOW, IT'S OUR TIME TO MAINTAIN IT AS GOOD AS WE CAN. 

WE ALL WRITE AND THINK THAT THIS IS RIGHT, THIS IS WRONG BUT WE NEVER EVER IMPLEMENT IT OURSELVES , WHY? IS IT ONLY WORK OF OTHERS? THEN WHO IS THIS OTHERS? 

FRIENDS, THAT OTHERS ARE WE. WE ARE THE FUTURE AND WE ALL ARE GOING TO CREATE THE FUTURE. BUT FOR FUTURE IT IS NECESSARY TO PRESERVE THE NATURE.NOW IT'S TIME TO IMPLEMENT OUR OWN THOUGHTS.

FIRECRACKERS OF 500 RUPEES CAN POLLUTE THE ENVIRONMENT.
                            BUT
A BOOK OF 100 RUPEES CAN PURIFY OUR LIFE.  CHOICE IS OURS. 
                            OR
SPENDING OF  SOME RUPEES FOR OUR PASSION CAN INCREASE OUR INTEREST, HAPPINESS AND UNIQUENESS AND FILL UP OUR LIFE WITH ENTHUSIASM.

THIS ARTICLE HAS NOT BEEN WRITTEN TO TELL YOU DO THIS, DO THAT AND DON'T DO THIS; BUT IT IS FOR REMINDING YOU WHAT WE LEARN, WE THINK AND WHAT WE ARE DOING...!!!

AND LAST BUT NOT LEAST, DON'T FORGET THAT WE ARE EDUCATED.

NOW YOU CAN GO OUT, BUT WHAT ARE YOU GOING TO BUY? PLEASE TELL ME.

INSPIRATION OF THIS ARTICLE:- RAJYOG

Saturday, 30 May 2020

हमने तो डरना छोड दिया है...


हमने तो डरना छोड दिया है,
पुरी दुनिया जहां से भाग रही,
वही रुकना ठाण लिया है।
सब भाग गए तो मुसीबतों से,
कौन लढेगा ए जाण लिया है।

हमने मुसीबतों का इरादा पहचान लिया है।
              देख अकेले हमे,
              वो तूट पडणे के लिए तैयार है।
              देख अकेले हमे,
              वो डराने के लिए तैयार है।
              देख अकेले हमे,
              वो हाराणे के लिए तैयार है।

हमारे पास साधन कम पर,
मन मे विश्वास भरपूर है।
लढ रहे है, हारा रहे है;
लढ रहे है, हारा रहे है।

देख अकेले हमे लढते हुए,
मुसीबतों को हारते हुए,
सब खडे हो गए डरते हुए।

अब हम सब साथ है,
मुसीबतों के बाप है।
हारना तो छोडीए, डरना भी अब पाप है।
                           
                                             ✍️एक विद्यार्थी.
--------------------------------------------------
विचारमाले विषयी अधिक माहिती:- विचारमाला

Tuesday, 12 May 2020

प्रवास एका अधिकाऱ्याचा... (भाग 1)


त्याच्या कार्यामुळे सर्वजण आनंदात असावेत,  त्याच्या कार्यामुळे सर्वजण सुखी व्हावेत,
त्याच्या कार्यामुळे सर्वजण सुरक्षित राहावेत,
त्याच्या कार्यामुळे नवा आदर्श घातला जावा,
या भावनेतून निर्माण झालेल त्याच स्वप्न,
हो त्याचच स्वप्न, आजपर्यंत जिवंत ठेवल त्याला.

लक्ष्य निश्चिती झाले पण मार्ग सापडत नव्हता, शिक्षकांच्या रूपात मार्गदर्शन भेटले अन मार्ग सापडला, 
हो मार्ग सापडला; अधिकारी बनण्याचा..

स्वप्नाच्या मार्गावर आधीच मोठ मोठाले खड्डे; 
'अवघड', 'अशक्य' या संज्ञेशी जोडलेले;
पण त्याच्या जिद्दीसमोर हरलेले.

दहावी पास, बारावी पास,
उच्चशिक्षणासाठी मोठ्या शहरात,
डिग्री पास त्याच आनंदात, त्याच जोशात,
प्रवास सुरु झाला...
हो प्रवास सुरु झाला, अधिकारी बनण्याचा.
-------------------------------------------------------------------

त्याला जाणीव होती त्याच्या परिस्थितीची,
त्याला आठवण होती त्याच्या आई-वडिलांची,
त्याला माहीत होत प्रेरक-उत्प्रेरकांच आक्रमण,
त्याला समजत होती आधुनिकतेची,
त्याला जिव्हाळा होता मानवतेचा,
त्याला इच्छा होती पुनरुत्थानाची,
त्याला आशा होती नवनिर्मितीची, विकसित देशाची...

संन्यस्त झाला तो अनिश्चित काळासाठी 
हो संन्यस्त झाला तो आई-वडिलांपासून,
    संन्यस्त झाला तो घरच्या कार्यांपासून,
    संन्यस्त  झाला तो समाजापासून,
    संन्यस्त, संन्यस्त, संन्यस्त सर्वांपासूनच...

शिकवणी वर्ग, सेमिनार, अभ्यास, मार्गदर्शन, नोट्स आणि सराव सराव सराव...
त्याच्या जिद्दीला तोडणार साधनच पुढे आलं नाही...

दिवस रात्र न पाहता;
घडयाळीच्या काट्याला शांत करून अभ्यास करू लागला;
फक्त अधिकारी बनण्यासाठी.

                                                               भाग 2

प्रवास एका अधिकाऱ्याचा...(भाग 2)

परीक्षेचे दिवस;
तोच जोश, तोच उत्साह...

पूर्वपरीक्षा पास... 
मुख्य परीक्षा पास...
मुलाखत नापास...
भडीमार, भडीमार, भडीमार,
ओळखीतल्या अनामिकांनी खूप भडीमार केला त्याच्यावर... 
पण तो निर्भीड... 
पुन्हा उठला... 

पुन्हा;
शिकवणी वर्ग, सेमिनार, अभ्यास, मार्गदर्शन, नोट्स आणि सराव सराव सराव...
त्याच्या जिद्दीला तोडणार साधनच पुढे आलं नाही...

दिवस रात्र न पाहता;
घडयाळीच्या काट्याला शांत करून अभ्यास करू लागला;
फक्त अधिकारी बनण्यासाठी.

दुसरा प्रयत्न;
तोच जोश, तोच उत्साह...

पूर्व पास,
मुख्य पास,
मुलाखत जोरदार,
प्रश्नांचा वेग जोरात,
याबद्दल काय वाटत? त्याबद्दल काय वाटत?
हे असच का? ते तसच का?
उत्तरांचा वेगही जोरात,
बत्तीस मिनिटानंतर प्रश्नोत्तराच युद्ध संपल, मुलाखत संपली.
-------------------------------------------------------------------
मे च्या उत्तरार्धात, शेताच्या बांधावर; 
            अदृश्य भविष्याची स्वप्न पहात बसला होता; 
फोन वाजला, निकाल लागला, तो अधिकारी झाला;                      अदृश्य भविष्य स्पष्ट झालं.

मार्गदर्शन करणारे शिक्षक आठवले; 
खंबीरपणे उभे राहणारे आई-वडील आठवले; 
बारा वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न आठवले; 
स्वप्नात पाहिलेला देश आणि देशाचे भवितव्य आठवले;
सोसलेली दर्दनाक गरीबी आठवली;
जगाने केलेली चेष्टा आठवली;

आज ओळखीतले अनामिक, ओळखीतले हितचिंतक बनण्याचा प्रयत्न करत होते;
तो सर्वांना माफ केला.


तो अधिकारी झाला. 






                                                                           भाग 1

Thursday, 23 April 2020

टीकेच्या अर्थासंदर्भात...




टीका करावी पण अपुऱ्या ज्ञानाने नको,
उणिवा दर्शवावे पण मनस्ताप होईल असे नको,
मार्ग सुचवावे पण अंमलबजावणीची सक्ती नको,
परखड बोलावे पण असत्य नको.


स्वतःची बढाई मारण्यासाठी, स्वतःचे ज्ञान दर्शवण्यासाठी टीका  नसावी, टीकेला पण काही अर्थ असावा.

टीका एकटी नसावी,  गुणगान ही असाव कारण कोणतीही गोष्ट पूर्णपणे वाईट नसते.

थोडक्यात ,

भाष्य टीकात्मक नसाव,  समजून सांगणार असावं.

आणि हं,

भाष्य करताना सातत्याने टिकाच करणे थोरांचे लक्षण नाही हेही लक्षात असाव.




धन्यवाद, मी आपला आभारी आहे.




Wednesday, 8 April 2020

स्मशानभूमी



आज स्मशानभूमीतुन मावळत्या सूर्याला पाहत होतो,

स्मशानभूमीत मानव लाकडाच्या सरणावर जळत होता;
                    त्याच्याजवळ कावळे कुठेही दिसत नव्हते,
                    गाय दूर थांबूनच हसत होती.

आज स्मशानभूमी भरगच्च भरली होती,
       संपूर्ण जग जळायला आलय असा वाटत होतं;

अग्नी स्वतःच  प्रकट झाली होती;
       मानवतेच्या रक्षणासाठी प्रकट झाली असावी कदाचित.
जोराचा वारा सुटल्यामुळे आग अधिक तिव्र होत होती;
माणवासोबत त्याची वाईट कर्मही जळत आहेत असा भास होत होता.

आकाश आणि भूमाता आज शांत होते,
चांगले कर्म अजून जिवंत आहेत असे त्यांना पाहून वाटत होते.

मानवाचा विकास आज त्याच्या मदतीला येणार नव्हता,
                              कारण मानवच मृत पडला होता;
मावळता सूर्य नवीन दिवस उजाडणार आहे याचे संकेत देत होता.

मी शांतपणे उभा टाकलो होतो;
  आगीचा भडका उडाला आणि मी देखील त्यात जळू लागलो;
  स्मशानभूमीत जिवंतपणे जळणाऱ्यांच्या मदतीसाठी थांबलो एवढीच माझी चूक होती.

   त्यानंतर माझं आणि जळणाऱ्या मानवाच काय झालं मला माहित नाही.

    नवीन दिवस उजाडला का हो?



【स्मशानभूमी ही कविता माझ्या आवाजात M 4 MARATHI CHANNEL वर नक्की पहा, ऐका ...】

धन्यवाद
धन्यवाद, मी आपला आभारी आहे.





Monday, 6 April 2020

अ मिटिंग विथ कोरोना


तो माझ्यावर आक्रमण करण्याआधीच मी मास्क लावून घेतलो आणि तो खाली पडला. मी हळूच त्याला झाडाच्या पानावर घेऊन पुण्याच्या पाउलवाटेवरील आसनावर आसनस्थ झालो आणि त्याला लाडिगोडी लावून त्याच्याशी मैत्री केलो.

तो सांगत होता की त्याच आयुष्य खूप छोटस असतं, अगदी काही तासांच;  पण  या काही तासांच्या आयुष्यात तो सतत आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा पण जेंव्हा त्याचा रस्ता आणि राहण्याचं ठिकाण प्राण्यातून माणवाकडे वळले तेंव्हापासून त्याला शांतपणे राहताच येत नाही. इतके मोठे संकट त्याच्या आयुष्यात कदाचित पहिल्यांदाच आले असावे.

तो पुढे बोलू लागला , अनेक गोष्टी सांगू लागला म्हणून मी त्याला थोडावेळ थांबवलं आणि बाजूच्या शॉप मध्ये जाऊन एक माझा ची बॉटल आणली, त्याच्यासाठीही एक थेंब पानावर टाकलो; तो आता काही तासांच्या आत मरणार होता तरीही तो खूप शांत आणि समाधान दिसत होता.

मी त्याला विचारलो - "हे कोरोना, तुझा जन्म झाल्यानंतर अगदी काही तासांच्या आत  तू मरणार आहेस याची भीती नाही का वाटत तुला?"  तो नकळत माझ्याकडे पाहिला, हसला आणि बोलू लागला, " हो यशवंता, मला माहित आहे की मी अगदी काही तासांच्या आत मरणार आहे पण मला हे नक्की माहीत नसते की - मी कोणत्या तासाच्या-कितव्या मिनिटाच्या-कितव्या सेकंदाला मरणार आहे; त्यामुळे मी त्याची म्हणजे मरणाची वाट बघत बसत नाही.  तितक्याच काहीश्या तासातच मी खूप आनंदी राहतो, माझ्या भावंडांबरोबर खेळतो, बागडतो;  तेवढ्याच कालावधीत माझ्या काही भावंडांचा मृत्यू होतो पण काही नवीन भावंडे लगेच जन्माला येतात; त्यामुळे काहीतरी गमावल्याच दुःख न बाळगता काहीतरी मिळवल्याचा आनंद साजरा करतो."

मी कोरोनाचे हे शब्द ऐकून थक्क झालो आणि शांत बसलो तेवढ्यात तो ओरडला   ' यशवंता, मला परत भूख लागली'  पण या वेळेस तो माझा पिण्यास नकार देत होता म्हणून मी आजूबाजूला पाहिलं तर पाऊलवाटेवर एक कोपऱ्यात अनेक मुंग्या आणि घरमाश्या एका उंदराच भक्षण करीत होते,  कदाचित मांजराने अर्ध खाऊन टाकलं असेल.  त्यातला थोडासा भाग लाकडाच्या छोट्याशा तुकड्याने घेऊन कोरोनाच्या पानावर आणून टाकलो. मग तो त्याच्यावर ताव मारू लागला आणि मी माझा पिऊ लागलो.

तेवढ्यात तो माझ्याकडे पाहून विचारला, "यशवंता, तुम्ही मानव खूपच डरपोक दिसताय मला, मी जेव्हापासून तुमच्या शरीरात आसरा घेतलो तेंव्हापासून तुम्हां मानवांची धांदलच उडाली. तुम्ही मृत्यूला घाबरता का रे?" "छे, नाही रे, आम्ही तर मृत्यू येण्याआधीच दोराने फाशी घेऊन, विष पिऊन, दारू, सिगारेट, तंबाखूच्या आहारी जाऊन मरण येण्याआधीच मरतो पण प्रत्येकाची कारणे वेगवेगळी असतात" माझ्या तोंडातून सर्रकन उत्तर निघालं.

"व्वा, तुमच्याकडे तर मरणाचे खूपच व्हरायटीझ आहेत रे, सेलेक्ट करा आणि मरा" कोरोना हसू लागला.

"बरं, मला सांग कोरोना, तुला अचानक आमच्या शरीरात आसरा घेण्याची आणि आम्हाला जीवे मारण्याची आवड का निर्माण झाली?"   "हे बघ यशवंता, असा हा जीवे मारण्याचा गुन्हा माझ्यावर लादू नकोस, मला काहीएक आनंद मिळत नाही तुम्हाला मारून"   "मग..."  मला थांबवत तो एकदम शांतपणे बोलला, "मला सांग यशवंता, जर तुझे आश्रयस्थान सातत्याने कोणीतरी नष्ट करत असेल तर तू काय करशील? मला माहित आहे की आपण सहनशील असायला पाहिजे पण सहनशीलतेलाही काही मर्यादा असतात रे.  तुम्हा मानवालाच - काय खायला पाहिजे, कस खायला पाहिजे, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा की नाही हे समजत नसेल तर त्यात आमचा काहीएक दोष नाही. तुम्ही जिथे जिथे अस्वछता करता तिथे तिथे आम्ही विषाणू निर्माण होतो; अगदी तुम्ही जिथे थुंकता तेथेही आम्ही विषाणू, जिवाणू जन्म घेतो. 'जिथे अस्वछता, तिथे आम्ही' हा तर आमचा मूलमंत्र आहे, मित्रा" दोघेही शांत आणि स्तब्ध बसलो. माझ्या तोंडातून शब्द फुटेनात हे पाहून तोच पुढे बोलू लागला,

"तुम्ही मानव सर्वशक्तीमान आहात पण तुम्ही प्रकृतीच्या विरोधात कार्य करत असाल, प्रकृतीला त्रास देत असाल तर ती तुमच्यापेक्षाही बलाढ्य शक्ती निर्माण करू शकते. भूकंप, लाटा, ज्वालामुखी, त्सुनामी ही त्याचीच तर उदाहरणे आहेत. आम्ही विषाणू तुमचा अंत करणार नाही तर तुम्ही स्वतःच तुमच्या शेवटाची कट्यार धारदार करत आहात, ती कट्यारच तुमचा अंत करेल" 

बस ना यार कोरोना, इतकी दूषणे नको ना देऊ आम्हाला. तुला माहीत आहे का आम्ही किती हुशार आहोत?, "हो, माहीत आहे, येत्या काही दिवसात तुम्ही एखादी लस तयार करून तुम्ही आमचा खात्मा कराल , त्याही आधी वाढत्या तापमानामुळे आमचं बरचस प्रमाण कमी होईलच.         आणि तुमच्या हुशारीच एक उदाहरण म्हणजे आम्ही चीनमधून बाहेर पडून तुमच्या देशात येण्यापूर्वीच तुम्ही आमच्यावर नियंत्रण आणण्याचे उपाय शोधून काढला, रे" दोघेही हसु लागलो, "बस ना यार कशाला चेष्टा करतोस, आणि तू विना पासपोर्ट विना व्हिसा च एकदम वेगात पृथ्वीवर प्रवास केला रे, ही पण आश्चर्यकारक बाब आहे, नाही का?"  परत दोघात हास्य पेटला.

त्यानंतर काही वेळासाठी दोघेही पाऊलवाटेवरील आसनावर निवांत पहुडलो.  थोड्यावेळाने कोरोना पुटपुटला,"यशवंत, तुझं जस नाव आहे तस मलापण तुझ्या आवडीच एखाद नाव देना"

" नको मित्रा, नाव आलं की आडनाव येते; आडनाव आलं की जात येते; जात आली की धर्म येतो; धर्म आला की बंधने आणि अत्याचार येतात" मी बोललो.   

तेवढ्यात वाऱ्याची एक मोठी झुळूक आली आणि कोरोनाला त्याच्या पाणासोबत घेऊन गेली आणि माझा एक मित्र तीथेच हरवला.
कदाचित आतापर्यंत तो मृत्यूही पावला असेल.


कोरोनाने मला अनेक गोष्टी शिकवल्या त्या म्हणजे:-

1) तू कितीही शक्तिशाली, कितीही हुशार असलास तरीही तुझ्यापेक्षा बलाढ्य आणि हुशार जीव या भूतलावर अस्तित्व करत आहे.

2) तुझा अंत तुझ्याच कार्यामुळे होऊ शकतो म्हणून आताच सावर.



(टीप:- कोरोनाबद्दल चुकीची अफवा पसरवण्याचा लेखकाचा उद्देश नाही. काही चूक आढळल्यास किंवा काही सुचवायचं असल्यास नक्की सुचवा, स्वीकारलं जाईल.

E-MAIL ID:- ytingale@gmail.com)
धन्यवाद धन्यवाद, मी आपला आभारी आहे.

उपचारापेक्षा प्रतिबंध बरा...



देशात अनेक अनपेक्षित घटना घडत असतात. जसे की:- दुष्काळ, पूर, उपासमार, बालगुन्हेगारी, दहशतवाद, महिलांवरील अत्याचार, इ. आणि त्या विशिष्ट कालावधीपूरतीच त्यांच्या विरोधात आंदोलने, प्रदर्शने, मुकमोर्चे निघतात. हे सर्व तेंव्हाच होते जेंव्हा एखादी घटना घडते, त्यानंतर त्या विषयी कोणीही बोलत नाही, तशा घटना घडू नयेत म्हणून नंतर कोणीही उपाययोजनांचा विचार करीत नाही. अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. याचा अर्थ; शरीराला एखाद्या रोगाने ग्रासल्या नंतरच त्यावर औषोधोपचार करायचा आणि एकदा का रोग बरा झाला की शरीराकडे दुर्लक्ष करायचा असा होतो, नाही का?

आपण सुजाण नागरीक आहोत. भारतासारख्या लोकशाही देशाला कोण-कोणत्या समस्या भेडसावू शकतात याचा अंदाज घेऊन ती समस्याच निर्माण होऊ नये म्हणून सातत्याने वैयक्तिक किंवा सामुहिक पातळीवर कार्य करत राहायला पाहिजे. असे करत असताना, जरी एखादी घटना अनावधानाने घडली तरी त्यातून खूप लवकर आपण बाऊंस बॅक घेऊ शकतो कारण त्या वेळेला घटनेची तीव्रता कमी असेल.

थोडस त्याही पुढे जाऊन सांगायच म्हणजे;  प्रत्येक अनपेक्षित घटना ही संकट नसते तर ते आपल्याद्वारे झालेल्या किंवा न झालेल्या कार्याचा परिणाम असतो. उदाहरनात- वाहतूक नियम न पाळल्यामुळे होणारे अपघात, मोबाइल सारख्या वाढत्या तंत्रज्ञानाच्या  अतिवापरामुळे होणारे शारीरिक किंवा मानसिक परिणाम, वृक्षतोडीमुळे होणारी वातावरणातील तापमानाची वाढ, उपासमारी, प्रदूषण  या सर्वांना आपल्यालाच तोंड द्यावे लागते कारण हे सर्व आपल्यामुळेच निर्माण होत आहे.

देशापुढील प्रत्येक संकटाच्या बाबतीत प्रशासन नेहमीच सतर्क असायला पाहिजे त्याचबरोबर नागरिक म्हणून आपणही जागृत असायला पाहिजे. प्रत्येक कार्य एकट्यामुळे पूर्णत्वास जात नाही पण देशाला विकसित राष्ट्र पाहण्याची स्वप्न बाळगणाऱ्या सर्वांनी जर चांगल्या कार्याची सुरुवात (नेहमीसाठीच) वैयक्तिक पातळीवरून केली तर आपला देश नक्कीच प्रगत राष्ट्र बनेल.


(टीप:- काही चूक आढळल्यास किंवा काही सुचवायचं असल्यास नक्की सुचवा, स्वीकारलं जाईल.

E-MAIL ID:- ytingale@gmail.com)



धन्यवाद
धन्यवाद, मी आपला आभारी आहे.