Saturday 23 December 2023

मैत्रीचे पत्र 2

 प्रिय,

     रोहित ... पाटील (आदरयुक्त बिलकुल नाही)

कॉलेज च्या शेवटच्या दिवसांमध्ये आपण रोज सकाळी १५ ते २० मिनिट कॉलेज ला लवकर पोहोचायचो आणि कॉलेज समोरच्या टिशॉपवर (चहाची टपरी) चहा पियायचो. एका दिवशी तू पैसे भरायचास; दुसऱ्या दिवशी मी आणि ज्या दिवशी दोघांकडेही पैशाची टंचाई असायची तेंव्हा कसेबसे करून दोघांत एक चहा घ्यायचो... वन बाय टू... आणि दररोज त्याच टिशॉप समोरच्या SP बिर्याणी हाऊस च्या मोठयाशा पाठीकडे बघत - " आपण यामध्ये बिर्याणी कधी खायची " याचा प्लान करायचो. हा आपला रोज सकाळच्या दिनक्रमाचा मुख्य भाग असायचा. 

एके दिवशी ठरलेल्या प्लान नुसार आपण परीक्षा सुरू होण्याच्या एक दिवस आधी तिथे बिर्याणी खाण्यासाठी जाणार होतो. पण आपल्याला वाटल की परीक्षेचा अभ्यास खूप पेंडिंग आहे... मग ठरल की GEOGRAPHY चा पेपर ज्या दिवशी आहे; त्या दिवशी जाऊया कारण त्याच्या दोन दिवसानंतर ECONOMY चा पेपर होता... पण नंतर दोघांच्याही लक्षात आल की जशी आपल्याकडे पैशांची टंचाई आहे तशीच ECONOMICS च्या CONCEPTS ची... त्यामुळे दोन दिवसांत CONCEPTS ची भरपाई करण अशक्य वाटत होत; म्हणून त्यादिवशीचाही प्लान CANCEL झाला. 

परीक्षेच्याच कालावधीत तुझा MPSC STI PRELIMS चा  RESULT आला आणि तू PRELIMS CLEAR केला... MPSC ची PRELIMS CLEAR केला भाई तू... आणि तेही पहिल्याच प्रयत्नात... CONGRATULATIONS भाई..!!! THIRD  YEAR च्या शेवटच्या SEMESTER चे पेपर लिहीत असताना तू   MPSC PRE CLEAR केला भाई... अदभूत !!! मग आपल त्याच दिवशी ठरल की तुला किंवा मला ज्या दिवशी JOB लागेल त्या दिवशी आपण SP ची बिर्याणी खायची... भाई, एक गोष्ट सांगू... माझ अंतर्मन सांगतय की आता आपण लवकरच SP ची बिर्याणी खाणार आहोत...

भाई, पण ती बिर्याणी व्हेज आहे की नॉनव्हेज? नाहीतर परत प्लान चेंज करावा लागेल!!! मग आपल्याला परत त्याच टिशॉपवर चहा पित विचार करावा लागेल... मला तर चालेल...

भाई, आज तुझा जन्मदिवस, त्यानिमित्तानेच हे पत्र आणि आठवण. HAPPY BIRTHDAY BHAI...✨✨✨

तेरे सारे गुन्हे माफ भाई... 

तेरी सारी रजाएँ मंजूर भाई... 

भाई ए जिंदगी बहोत  छोटी है, अगले जनम मेभी तेरी दोस्ती मुझे कबूल भाई...

                                                  कल जैसे, मुझे; आज और फिर कल भी  संभाल लेणा भाई...  


                                  जन्मदिवसाच्या मनापासून शुभेच्छा भाई... ✨✨✨ 

Sunday 17 December 2023

मैत्रीचे पत्र - १

 प्रिय,

      गंगाधर.. गंगा... गंग्या... पाटील... 

पाटील, तुम्हाला महिती आहे का ... मी दिवाळीपेक्षा आपल्या  गावच्या जत्रेची जास्त आतुरतेने वाट पाहत असतो.  ते पहिल्या दिवशीच जागरण-गोंधळ , ती खंडेरायाची पालखी , त्या गावाबाहेरच्या कुस्त्या आणि आपली यारी-दोस्ती... हे सर्व माझ्या आवडीचे अमूल्य क्षण एकदाच जुळवून आणणार सण म्हणजे आपल्या गावची जत्रा... दत्त जयंतीचा कालावधी... माझ्या आयुष्यात; जेंव्हापासून मला समजायला लागल तेंव्हापासून आतापर्यंत फक्त एकदाच आपल्या गावच्या जत्रेला येऊ शकलो नाही. पण; पाटील... यानंतर मी  नेहमी हजर राहील बरका... आपल्या जत्रेमध्ये. 

जागरणाच्या रात्री, चहा पुरवण्याच काम आमच्याकडे तर पालखी ओढण्याचा विशेष मान तुमच्याकडे; कुस्त्याच्या दिवशी तुमचा जंगी सामना इतर प्रतिस्पर्धकांसोबत तर तुम्ही कुस्ती जिंकावी म्हणून माझी धाकधूक माझ्या मनासोबत; असो. कुस्त्या पाहायला मलादेखील आवडतात पण तासाभरापेक्षा जास्तवेळ मी मैदानावर नाही थांबू शकत, कारण त्याच कालावधीत मला नेमून दिलेल्या इतर कामांमुळे... पण मैदानावर त्या कालावधीत काय घडतंय याची खबर मला असते बरका. 

आकाशी पाळणे, मंदिरासमोरची खेळभांड्याची अन प्रसादाची दुकाने, सुशोभित मंदिरे, गावातील जुनी दुकाने नवीन रूपात रूपांतरित, बेकायदेशीर झेंडी, तितली हे कायदेशीर जागेत एकदम इमानदारीने चालणारे अस्थायी खेळ; गावात जत्रेसाठी येणाऱ्या नवीन भाविकांची गर्दी, यांमुळे संपूर्ण गाव एकदम खुलून येत. 



पाटील, आपण गावाबाहेर कुठेही काहीही कारणांमुळे कितीही वेळ राहिलो ना , तरीही गावात जो आनंद, सुख, समाधान, शांती मिळते ना ती गावाबाहेर कुठेच नाही... आपण गावामध्ये कोणत्याही गल्लीत कधीही जाउद्या... त्या गल्लीतील, त्या वाड्यातील सर्व माणसे आपलीच वाटतात... कारण / आणि तीही तितकीच चांगली वर्तणूक (वागणूक) आपल्या सोबत करतात... गावात फिरताना नेहमी आपलेपनाची भावना कायम मनात राहते... पण गावाबाहेर आल्यानंतर परकेपणाची भावना आपोआप मनात जागा निर्माण करते, पण... जेंव्हा कोणीतरी आपलस वाटणार गावाबाहेर भेटत ना... तेंव्हा होणार आनंद गगनात मावेनासाच... आणि हं... पाटील... अशी माणसे गावाबाहेरही भेटतात बरका..!! जग खूप सुंदर आहे... पाटील... आता बघा ना... तुमची आणि माझी मैत्री गावातल्या पेक्षा गावाबाहेरच खूप प्रसिद्ध आहे. आपली ओळख जितकी गावामध्ये होती... त्यापेक्षा अधिक गावाबाहेर असतानाच झाली, नाही का..? आपली भेट जितकी गावात असताना होते त्यापेक्षा कैकपटीने अधिक बाहेरगावी असतानाच.

पाटील; एक गोष्ट सांगू... गावाबाहेर असताना अशीच आपलेपणाची भावना निर्माण करणारा अजून एक मित्र मला मिळाला... माझा अजून एक मित्र बनला... तोही एकदम तुमच्यासारखाच आहे... मी तुमच्याकडून मस्ती करायला शिकलो तर त्याच्याकडून जिवंतपणे जीवन जगायला शिकलो. अशी मैत्री करून ती टिकवण्यासाठी हे आयुष्य खूप छोटस आहे. यानंतरच पत्र मी त्यालाच लिहिणार आहे. असो. विषय खूप भरकटतोय..!!

पाटील, दिनांक २४ ते २८ डिसेंबर आपल्या गावची जत्रा आहे, त्याची आठवण करून देण्यासाठीच हे पत्र.  आणि यावेळेसची आपल्या जत्रेची विशेषतः म्हणजे - श्री संत बाळूमामा यांची मूर्ती स्थापना आणि मंदिर कलशारोहनाचा कार्यक्रम दिनांक २५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता संपन्न होणार आहे. एक नवीन दैविरुप संत नेहमीसाठी आपल्या गावात स्थानापन्न होणार आहेत. यावेळेस गावात आनंदच आनंद असणार. त्यामुळे मी पण येणार आहे तुम्ही पण या आणि वाचक मित्रहो तुम्ही पण यायच बरका... 


मग, 

         माझ्या गावच्या जत्रेला यायच,

         खंडेरायाच्या पालखीच दर्शन घ्यायच,

         संत बाळूमामाचा आशीर्वाद घ्यायचा,

         दत्त मंदिरात जेवण करायच,

         जंगी कुस्त्या पहायच्या,

        आणि जत्रेचा आनंद घ्यायचा बरका.       




सर्व मैत्रीचे पत्र 

धडपड