Wednesday 8 April 2020

स्मशानभूमी



आज स्मशानभूमीतुन मावळत्या सूर्याला पाहत होतो,

स्मशानभूमीत मानव लाकडाच्या सरणावर जळत होता;
                    त्याच्याजवळ कावळे कुठेही दिसत नव्हते,
                    गाय दूर थांबूनच हसत होती.

आज स्मशानभूमी भरगच्च भरली होती,
       संपूर्ण जग जळायला आलय असा वाटत होतं;

अग्नी स्वतःच  प्रकट झाली होती;
       मानवतेच्या रक्षणासाठी प्रकट झाली असावी कदाचित.
जोराचा वारा सुटल्यामुळे आग अधिक तिव्र होत होती;
माणवासोबत त्याची वाईट कर्मही जळत आहेत असा भास होत होता.

आकाश आणि भूमाता आज शांत होते,
चांगले कर्म अजून जिवंत आहेत असे त्यांना पाहून वाटत होते.

मानवाचा विकास आज त्याच्या मदतीला येणार नव्हता,
                              कारण मानवच मृत पडला होता;
मावळता सूर्य नवीन दिवस उजाडणार आहे याचे संकेत देत होता.

मी शांतपणे उभा टाकलो होतो;
  आगीचा भडका उडाला आणि मी देखील त्यात जळू लागलो;
  स्मशानभूमीत जिवंतपणे जळणाऱ्यांच्या मदतीसाठी थांबलो एवढीच माझी चूक होती.

   त्यानंतर माझं आणि जळणाऱ्या मानवाच काय झालं मला माहित नाही.

    नवीन दिवस उजाडला का हो?



【स्मशानभूमी ही कविता माझ्या आवाजात M 4 MARATHI CHANNEL वर नक्की पहा, ऐका ...】

धन्यवाद
धन्यवाद, मी आपला आभारी आहे.





No comments: