विचारमाले विषयी

विचारमाला लिहिणारा लेखक एक विद्यार्थी आहे.

विचारमाला लिहिणारा लेखक हा एक विद्यार्थी आहे.

आयुष्याची गाडी पुढे पुढे जात असताना मनाच्या सागरात उसळलेले विचार तिथेच शांत न होता, त्यांची कुठेतरी नोंद असावी म्हणून चालवलेला हा उपक्रम आहे...

विचारमाला लिहिणारा लेखक एक विद्यार्थी असल्यामुळे त्याच्याकडे अनुभवांची कमतरता आहे; पण मिळवलेल्या अनुभवाला उत्तमपणे मांडण्याची कला त्याच्याकडे आहे; असे त्याला वाटते म्हणून लिहिलेली ही अनुदिनी(BLOG) आहे...

फक्त अनुभवच न मांडता, समाज विश्वातील कार्य-प्रसंगातून काय शिकता येईल किंवा त्या कार्य-प्रसंगात सकारात्मक वृद्धी
कशाप्रकारे करता येईल; याबद्दल एका विद्यार्थाचे विचार मांडण्याची ही आवड आहे...

-------------------------------------------------------------------------

साहित्यविश्वातील कथा, लेख, कविता, नाटक इत्यादी वैविध्यपूर्ण रीतीने मांडण्याची आवड लेखकाला आहे. 

विचार मांडत असताना वास्तविक जीवनातील कुठल्याही घटकाची मानहानी होणार नाही याची तो पुरेपुर काळजी घेतो. 

लेखकाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषा बहुतांश प्रमाणात अवगत असल्यामुळे तो या भाषांतुन विचार मांडतो.

कोणतीही चूक न करता तो लिहिण्याचा प्रयत्न करतो पण तरीही 'माणूस हा चुकीचा पुतळा आहे' या विचाराप्रमाणे जर नकळत कोणत्याही प्रकारची चूक झाली तर नक्की कळवा.
                          स्वीकारलं जाईल.       
-----------------------------------------------------------------------------------                                
   प्रत्येक महिन्यात कमीत कमी दोन लेख प्रकाशित होतील.
                                            
                                                                                                                   ✍️एक विद्यार्थी.



1 comment:

Unknown said...

Nice Attempt. Good luck 👍