Showing posts with label वैचारिक. Show all posts
Showing posts with label वैचारिक. Show all posts

Sunday 31 January 2021

हास्य : एक स्वानुभव

काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. पुण्यातील लक्ष्मी रोड जवळच्या मेसवर; मी आणि माझा मित्र सिद्धार्थ जेवणासाठी गेलो होतो. त्या दिवशी आम्हाला खूप भूक लागली होती आणि मेसवर जाण्यासाठी देखील खूप उशीर झाला होता जवळपास रात्रीचे नऊ-साडेनऊ वाजले असतील. त्यामुळे, आम्हाला लवकर जेवण करून रूमला जायचं होत.

आम्ही दोघे मित्र जेवणासाठी बसलो; ताट आल आणि खूप भूक लागल्यामुळे एकदम वेगात जेवण करू लागलो. 

एक व्यक्ती खूप वेळेपासून आमच्या समोरच्या खुर्चीवर बसला होता,त्याच्यासमोर अजून जेवणाच ताट आल नव्हत. तो माझ्याकडे पाहून  दोन-तीन वेळेस हसला. पण मला खूपच भूक लागल्यामुळे मी थोडस त्याच्याकडे दुर्लक्ष करून जेवण करू लागलो. 

मी त्याच्याकडे पाहून हसत नसल्यामुळे; तो मला बोलला "तू MPSC करतो का?" 

मी थोडस दुर्लक्ष केल्यासारखं उत्तरलो "नाही, मी फक्त विचार करतोय"
.
.
"पण तुम्हाला अस का वाटल?" जेवणाचा वेग कमी करत थोडस आश्चर्यानेच विचारलो.

"तुझे कपडे पाहून;
खूपच फॉर्मल दिसतोस त्याबरोबरच टिका (अष्टगंध) वैगेरे लावून काही मॅटर(Matter) आहे का..." तो एकदम फ्रीली बोलून गेला.

मी देखील थोडस फ्री झालो आणि बोलून टाकलो "काही मॅटर होऊ नये म्हणूनच तर फॉर्मल घालतो"

मग काय हास्याचा कल्लोळच...!!! 

"तू काही काळजी करू नको, MPSC वाले कोणाकडे लक्ष देतच नाहीत आणि दिलं तरीही त्यांच्या डोक्यात MPSC च असते" तो क्षणात उत्तरला.

मग काय हास्यच हास्य, आनंदच आनंद...

मग असाच काहीसा हास्यमय संवाद आमच्यात पुढचे काही मिनिटे चालू होता... मेस मध्ये फक्त आम्ही तिघेच हसत होतो.

मग आमचं जेवण झाल आणि आम्ही( मी आणि सिद्धार्थ) निघालो. तोपर्यंत त्याच्यासमोर जेवणाचा ताट आल होत.

त्याच नाव प्रशांत होत. त्यानंतर आम्ही कधीही भेटलो नाही.
-----------------------------------------------
आजदेखील सेम टू सेम प्रसंग घडला. थोड्याशा वैयक्तीक कारणामुळे चिंतेत होतो. रूमकडे जाण्यासाठी बस स्टॉपला येऊन थांबलो होतो, पण खूप वेळ झाला तरीही बस आली नव्हती. त्यामुळे एक रिक्षा आला त्यात बसलो.

ते रिक्षावाले काका खूपच टेंशन मध्ये दिसत होते. मी त्यांच्या लगतच बसलो होतो त्यामुळे ते मला म्हणाले "आज सकाळपासून फिर-फिर फिरलो पण एक देखील भाड लागलं नाही. सकाळपासून फक्त 350 रुपयेच जमले" 

मी माझ्या मनातली काळजी थोडीशी बाजूला ठेवून, त्यांना फ्रिली बोललो.

मग काय माझा स्टॉप येईपर्यंत मी पण आनंदात आणि रिक्षावाले काका पण आनंदात...
थोड्या वेळासाठी दोघेही आपापल्या मनातली काळजी विसरलो.
-----------------------------------------------

अशा प्रसंगातून मी काय शिकलो-

काही व्यक्ती आपल्या आयुष्यात खूपच क्षणिक कालावधीसाठी अवतरतात आणि खूप सारा आनंद देऊन जातात; ज्याच्याविषयी आपण कधी विचारही केलेला नसतो.

अनेक वेळेस असही होत की कोणीतरी आपल्याला आनंद देण्याचा प्रयत्न करत असतो पण तो आपण स्विकारतच नाही; आपण आपल्याच ATTITUDE, EGO, चिंता, काळजी... यामध्ये अडकून पडलेलो असतो.या सर्वांतून आपण बाहेर पडायला पाहिजे - जगाला काहीतरी दिलं पाहिजे, जगाकडून काहीतरी घेतल पाहिजे, शिकल पाहिजे.

खूप वेळेस आपलं आयुष्य मोठमोठ्या दुःखाने,संकटाने भरल्यासारखं वाटत; अशा वेळेस आयुष्याचा कंटाळाही यायला लागतो, त्रास व्हायला लागतो. पण हे सर्व विचार बाजूला ठेवून त्या प्रसंगाना, संकटांना बदलण्यासाठी स्वतःला आव्हान केलं पाहिजे, स्वतःत प्रेरणा निर्माण केली पाहिजे.

मग राहणार ना नेहमी आनंदात?
------------------------------------------------
विचारमालेविषयी अधिक जाणून घ्या:- विचारमाला

Friday 6 November 2020

TO THE POINT...

THIS ARTICLE IS BEING WRITTEN ON THE OCCASION OF DIPAWALI. 

HAPPY DIPAWALI IN ADVANCE💐💐.

HI FRIENDS, WE ALL ARE EDUCATED; YOU ARE READING THIS ARTICLE MEANS YOU ARE ALSO AN EDUCATED GUY. SO, WE KNOW WHAT IS RIGHT AND WHAT IS WRONG, DON'T WE?

ARE YOU GOING TO BUY FIRECRACKERS?JUST WAIT 2 MINUTES, READ THIS SHORT ARTICLE AND GO OUT. 

DO YOU KNOW WHAT ARE THE BAD EFFECTS OF FIRECRACKERS? DO YOU REALLY WANT TO BUY FIRECRACKERS AND DIE AT EARLY? NOW YOU MAY ASK ME WHY ARE YOU ASKING SUCH QUESTION TO US?
UNEXPECTED ENVIRONMENTAL CHANGES ARE HARMFUL FOR US. A MICRO CORONA VIRUS CAN PROHIBIT US FROM COMING OUT OF HOME THEN THINK WHAT WILL HAPPEN WHEN WHOLE ENVIRONMENT WILL CHANGE.

AS WE KNOW THAT IF WE CONSERVE NATURE , IT WILL CONSERVE US. DURING THE CORONA LOCKDOWN THE POLLUTION HAS DECREASED IN GREAT EXTENT. NOW, IT'S OUR TIME TO MAINTAIN IT AS GOOD AS WE CAN. 

WE ALL WRITE AND THINK THAT THIS IS RIGHT, THIS IS WRONG BUT WE NEVER EVER IMPLEMENT IT OURSELVES , WHY? IS IT ONLY WORK OF OTHERS? THEN WHO IS THIS OTHERS? 

FRIENDS, THAT OTHERS ARE WE. WE ARE THE FUTURE AND WE ALL ARE GOING TO CREATE THE FUTURE. BUT FOR FUTURE IT IS NECESSARY TO PRESERVE THE NATURE.NOW IT'S TIME TO IMPLEMENT OUR OWN THOUGHTS.

FIRECRACKERS OF 500 RUPEES CAN POLLUTE THE ENVIRONMENT.
                            BUT
A BOOK OF 100 RUPEES CAN PURIFY OUR LIFE.  CHOICE IS OURS. 
                            OR
SPENDING OF  SOME RUPEES FOR OUR PASSION CAN INCREASE OUR INTEREST, HAPPINESS AND UNIQUENESS AND FILL UP OUR LIFE WITH ENTHUSIASM.

THIS ARTICLE HAS NOT BEEN WRITTEN TO TELL YOU DO THIS, DO THAT AND DON'T DO THIS; BUT IT IS FOR REMINDING YOU WHAT WE LEARN, WE THINK AND WHAT WE ARE DOING...!!!

AND LAST BUT NOT LEAST, DON'T FORGET THAT WE ARE EDUCATED.

NOW YOU CAN GO OUT, BUT WHAT ARE YOU GOING TO BUY? PLEASE TELL ME.

INSPIRATION OF THIS ARTICLE:- RAJYOG

Monday 6 April 2020

अ मिटिंग विथ कोरोना


तो माझ्यावर आक्रमण करण्याआधीच मी मास्क लावून घेतलो आणि तो खाली पडला. मी हळूच त्याला झाडाच्या पानावर घेऊन पुण्याच्या पाउलवाटेवरील आसनावर आसनस्थ झालो आणि त्याला लाडिगोडी लावून त्याच्याशी मैत्री केलो.

तो सांगत होता की त्याच आयुष्य खूप छोटस असतं, अगदी काही तासांच;  पण  या काही तासांच्या आयुष्यात तो सतत आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा पण जेंव्हा त्याचा रस्ता आणि राहण्याचं ठिकाण प्राण्यातून माणवाकडे वळले तेंव्हापासून त्याला शांतपणे राहताच येत नाही. इतके मोठे संकट त्याच्या आयुष्यात कदाचित पहिल्यांदाच आले असावे.

तो पुढे बोलू लागला , अनेक गोष्टी सांगू लागला म्हणून मी त्याला थोडावेळ थांबवलं आणि बाजूच्या शॉप मध्ये जाऊन एक माझा ची बॉटल आणली, त्याच्यासाठीही एक थेंब पानावर टाकलो; तो आता काही तासांच्या आत मरणार होता तरीही तो खूप शांत आणि समाधान दिसत होता.

मी त्याला विचारलो - "हे कोरोना, तुझा जन्म झाल्यानंतर अगदी काही तासांच्या आत  तू मरणार आहेस याची भीती नाही का वाटत तुला?"  तो नकळत माझ्याकडे पाहिला, हसला आणि बोलू लागला, " हो यशवंता, मला माहित आहे की मी अगदी काही तासांच्या आत मरणार आहे पण मला हे नक्की माहीत नसते की - मी कोणत्या तासाच्या-कितव्या मिनिटाच्या-कितव्या सेकंदाला मरणार आहे; त्यामुळे मी त्याची म्हणजे मरणाची वाट बघत बसत नाही.  तितक्याच काहीश्या तासातच मी खूप आनंदी राहतो, माझ्या भावंडांबरोबर खेळतो, बागडतो;  तेवढ्याच कालावधीत माझ्या काही भावंडांचा मृत्यू होतो पण काही नवीन भावंडे लगेच जन्माला येतात; त्यामुळे काहीतरी गमावल्याच दुःख न बाळगता काहीतरी मिळवल्याचा आनंद साजरा करतो."

मी कोरोनाचे हे शब्द ऐकून थक्क झालो आणि शांत बसलो तेवढ्यात तो ओरडला   ' यशवंता, मला परत भूख लागली'  पण या वेळेस तो माझा पिण्यास नकार देत होता म्हणून मी आजूबाजूला पाहिलं तर पाऊलवाटेवर एक कोपऱ्यात अनेक मुंग्या आणि घरमाश्या एका उंदराच भक्षण करीत होते,  कदाचित मांजराने अर्ध खाऊन टाकलं असेल.  त्यातला थोडासा भाग लाकडाच्या छोट्याशा तुकड्याने घेऊन कोरोनाच्या पानावर आणून टाकलो. मग तो त्याच्यावर ताव मारू लागला आणि मी माझा पिऊ लागलो.

तेवढ्यात तो माझ्याकडे पाहून विचारला, "यशवंता, तुम्ही मानव खूपच डरपोक दिसताय मला, मी जेव्हापासून तुमच्या शरीरात आसरा घेतलो तेंव्हापासून तुम्हां मानवांची धांदलच उडाली. तुम्ही मृत्यूला घाबरता का रे?" "छे, नाही रे, आम्ही तर मृत्यू येण्याआधीच दोराने फाशी घेऊन, विष पिऊन, दारू, सिगारेट, तंबाखूच्या आहारी जाऊन मरण येण्याआधीच मरतो पण प्रत्येकाची कारणे वेगवेगळी असतात" माझ्या तोंडातून सर्रकन उत्तर निघालं.

"व्वा, तुमच्याकडे तर मरणाचे खूपच व्हरायटीझ आहेत रे, सेलेक्ट करा आणि मरा" कोरोना हसू लागला.

"बरं, मला सांग कोरोना, तुला अचानक आमच्या शरीरात आसरा घेण्याची आणि आम्हाला जीवे मारण्याची आवड का निर्माण झाली?"   "हे बघ यशवंता, असा हा जीवे मारण्याचा गुन्हा माझ्यावर लादू नकोस, मला काहीएक आनंद मिळत नाही तुम्हाला मारून"   "मग..."  मला थांबवत तो एकदम शांतपणे बोलला, "मला सांग यशवंता, जर तुझे आश्रयस्थान सातत्याने कोणीतरी नष्ट करत असेल तर तू काय करशील? मला माहित आहे की आपण सहनशील असायला पाहिजे पण सहनशीलतेलाही काही मर्यादा असतात रे.  तुम्हा मानवालाच - काय खायला पाहिजे, कस खायला पाहिजे, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा की नाही हे समजत नसेल तर त्यात आमचा काहीएक दोष नाही. तुम्ही जिथे जिथे अस्वछता करता तिथे तिथे आम्ही विषाणू निर्माण होतो; अगदी तुम्ही जिथे थुंकता तेथेही आम्ही विषाणू, जिवाणू जन्म घेतो. 'जिथे अस्वछता, तिथे आम्ही' हा तर आमचा मूलमंत्र आहे, मित्रा" दोघेही शांत आणि स्तब्ध बसलो. माझ्या तोंडातून शब्द फुटेनात हे पाहून तोच पुढे बोलू लागला,

"तुम्ही मानव सर्वशक्तीमान आहात पण तुम्ही प्रकृतीच्या विरोधात कार्य करत असाल, प्रकृतीला त्रास देत असाल तर ती तुमच्यापेक्षाही बलाढ्य शक्ती निर्माण करू शकते. भूकंप, लाटा, ज्वालामुखी, त्सुनामी ही त्याचीच तर उदाहरणे आहेत. आम्ही विषाणू तुमचा अंत करणार नाही तर तुम्ही स्वतःच तुमच्या शेवटाची कट्यार धारदार करत आहात, ती कट्यारच तुमचा अंत करेल" 

बस ना यार कोरोना, इतकी दूषणे नको ना देऊ आम्हाला. तुला माहीत आहे का आम्ही किती हुशार आहोत?, "हो, माहीत आहे, येत्या काही दिवसात तुम्ही एखादी लस तयार करून तुम्ही आमचा खात्मा कराल , त्याही आधी वाढत्या तापमानामुळे आमचं बरचस प्रमाण कमी होईलच.         आणि तुमच्या हुशारीच एक उदाहरण म्हणजे आम्ही चीनमधून बाहेर पडून तुमच्या देशात येण्यापूर्वीच तुम्ही आमच्यावर नियंत्रण आणण्याचे उपाय शोधून काढला, रे" दोघेही हसु लागलो, "बस ना यार कशाला चेष्टा करतोस, आणि तू विना पासपोर्ट विना व्हिसा च एकदम वेगात पृथ्वीवर प्रवास केला रे, ही पण आश्चर्यकारक बाब आहे, नाही का?"  परत दोघात हास्य पेटला.

त्यानंतर काही वेळासाठी दोघेही पाऊलवाटेवरील आसनावर निवांत पहुडलो.  थोड्यावेळाने कोरोना पुटपुटला,"यशवंत, तुझं जस नाव आहे तस मलापण तुझ्या आवडीच एखाद नाव देना"

" नको मित्रा, नाव आलं की आडनाव येते; आडनाव आलं की जात येते; जात आली की धर्म येतो; धर्म आला की बंधने आणि अत्याचार येतात" मी बोललो.   

तेवढ्यात वाऱ्याची एक मोठी झुळूक आली आणि कोरोनाला त्याच्या पाणासोबत घेऊन गेली आणि माझा एक मित्र तीथेच हरवला.
कदाचित आतापर्यंत तो मृत्यूही पावला असेल.


कोरोनाने मला अनेक गोष्टी शिकवल्या त्या म्हणजे:-

1) तू कितीही शक्तिशाली, कितीही हुशार असलास तरीही तुझ्यापेक्षा बलाढ्य आणि हुशार जीव या भूतलावर अस्तित्व करत आहे.

2) तुझा अंत तुझ्याच कार्यामुळे होऊ शकतो म्हणून आताच सावर.



(टीप:- कोरोनाबद्दल चुकीची अफवा पसरवण्याचा लेखकाचा उद्देश नाही. काही चूक आढळल्यास किंवा काही सुचवायचं असल्यास नक्की सुचवा, स्वीकारलं जाईल.

E-MAIL ID:- ytingale@gmail.com)
धन्यवाद धन्यवाद, मी आपला आभारी आहे.

उपचारापेक्षा प्रतिबंध बरा...



देशात अनेक अनपेक्षित घटना घडत असतात. जसे की:- दुष्काळ, पूर, उपासमार, बालगुन्हेगारी, दहशतवाद, महिलांवरील अत्याचार, इ. आणि त्या विशिष्ट कालावधीपूरतीच त्यांच्या विरोधात आंदोलने, प्रदर्शने, मुकमोर्चे निघतात. हे सर्व तेंव्हाच होते जेंव्हा एखादी घटना घडते, त्यानंतर त्या विषयी कोणीही बोलत नाही, तशा घटना घडू नयेत म्हणून नंतर कोणीही उपाययोजनांचा विचार करीत नाही. अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. याचा अर्थ; शरीराला एखाद्या रोगाने ग्रासल्या नंतरच त्यावर औषोधोपचार करायचा आणि एकदा का रोग बरा झाला की शरीराकडे दुर्लक्ष करायचा असा होतो, नाही का?

आपण सुजाण नागरीक आहोत. भारतासारख्या लोकशाही देशाला कोण-कोणत्या समस्या भेडसावू शकतात याचा अंदाज घेऊन ती समस्याच निर्माण होऊ नये म्हणून सातत्याने वैयक्तिक किंवा सामुहिक पातळीवर कार्य करत राहायला पाहिजे. असे करत असताना, जरी एखादी घटना अनावधानाने घडली तरी त्यातून खूप लवकर आपण बाऊंस बॅक घेऊ शकतो कारण त्या वेळेला घटनेची तीव्रता कमी असेल.

थोडस त्याही पुढे जाऊन सांगायच म्हणजे;  प्रत्येक अनपेक्षित घटना ही संकट नसते तर ते आपल्याद्वारे झालेल्या किंवा न झालेल्या कार्याचा परिणाम असतो. उदाहरनात- वाहतूक नियम न पाळल्यामुळे होणारे अपघात, मोबाइल सारख्या वाढत्या तंत्रज्ञानाच्या  अतिवापरामुळे होणारे शारीरिक किंवा मानसिक परिणाम, वृक्षतोडीमुळे होणारी वातावरणातील तापमानाची वाढ, उपासमारी, प्रदूषण  या सर्वांना आपल्यालाच तोंड द्यावे लागते कारण हे सर्व आपल्यामुळेच निर्माण होत आहे.

देशापुढील प्रत्येक संकटाच्या बाबतीत प्रशासन नेहमीच सतर्क असायला पाहिजे त्याचबरोबर नागरिक म्हणून आपणही जागृत असायला पाहिजे. प्रत्येक कार्य एकट्यामुळे पूर्णत्वास जात नाही पण देशाला विकसित राष्ट्र पाहण्याची स्वप्न बाळगणाऱ्या सर्वांनी जर चांगल्या कार्याची सुरुवात (नेहमीसाठीच) वैयक्तिक पातळीवरून केली तर आपला देश नक्कीच प्रगत राष्ट्र बनेल.


(टीप:- काही चूक आढळल्यास किंवा काही सुचवायचं असल्यास नक्की सुचवा, स्वीकारलं जाईल.

E-MAIL ID:- ytingale@gmail.com)



धन्यवाद
धन्यवाद, मी आपला आभारी आहे.