काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. पुण्यातील लक्ष्मी रोड जवळच्या मेसवर; मी आणि माझा मित्र सिद्धार्थ जेवणासाठी गेलो होतो. त्या दिवशी आम्हाला खूप भूक लागली होती आणि मेसवर जाण्यासाठी देखील खूप उशीर झाला होता जवळपास रात्रीचे नऊ-साडेनऊ वाजले असतील. त्यामुळे, आम्हाला लवकर जेवण करून रूमला जायचं होत.
आम्ही दोघे मित्र जेवणासाठी बसलो; ताट आल आणि खूप भूक लागल्यामुळे एकदम वेगात जेवण करू लागलो.
एक व्यक्ती खूप वेळेपासून आमच्या समोरच्या खुर्चीवर बसला होता,त्याच्यासमोर अजून जेवणाच ताट आल नव्हत. तो माझ्याकडे पाहून दोन-तीन वेळेस हसला. पण मला खूपच भूक लागल्यामुळे मी थोडस त्याच्याकडे दुर्लक्ष करून जेवण करू लागलो.
मी त्याच्याकडे पाहून हसत नसल्यामुळे; तो मला बोलला "तू MPSC करतो का?"
मी थोडस दुर्लक्ष केल्यासारखं उत्तरलो "नाही, मी फक्त विचार करतोय"
.
.
"पण तुम्हाला अस का वाटल?" जेवणाचा वेग कमी करत थोडस आश्चर्यानेच विचारलो.
"तुझे कपडे पाहून;
खूपच फॉर्मल दिसतोस त्याबरोबरच टिका (अष्टगंध) वैगेरे लावून काही मॅटर(Matter) आहे का..." तो एकदम फ्रीली बोलून गेला.
मी देखील थोडस फ्री झालो आणि बोलून टाकलो "काही मॅटर होऊ नये म्हणूनच तर फॉर्मल घालतो"
मग काय हास्याचा कल्लोळच...!!!
"तू काही काळजी करू नको, MPSC वाले कोणाकडे लक्ष देतच नाहीत आणि दिलं तरीही त्यांच्या डोक्यात MPSC च असते" तो क्षणात उत्तरला.
मग काय हास्यच हास्य, आनंदच आनंद...
मग असाच काहीसा हास्यमय संवाद आमच्यात पुढचे काही मिनिटे चालू होता... मेस मध्ये फक्त आम्ही तिघेच हसत होतो.
मग आमचं जेवण झाल आणि आम्ही( मी आणि सिद्धार्थ) निघालो. तोपर्यंत त्याच्यासमोर जेवणाचा ताट आल होत.
त्याच नाव प्रशांत होत. त्यानंतर आम्ही कधीही भेटलो नाही.
-----------------------------------------------
आजदेखील सेम टू सेम प्रसंग घडला. थोड्याशा वैयक्तीक कारणामुळे चिंतेत होतो. रूमकडे जाण्यासाठी बस स्टॉपला येऊन थांबलो होतो, पण खूप वेळ झाला तरीही बस आली नव्हती. त्यामुळे एक रिक्षा आला त्यात बसलो.
ते रिक्षावाले काका खूपच टेंशन मध्ये दिसत होते. मी त्यांच्या लगतच बसलो होतो त्यामुळे ते मला म्हणाले "आज सकाळपासून फिर-फिर फिरलो पण एक देखील भाड लागलं नाही. सकाळपासून फक्त 350 रुपयेच जमले"
मी माझ्या मनातली काळजी थोडीशी बाजूला ठेवून, त्यांना फ्रिली बोललो.
मग काय माझा स्टॉप येईपर्यंत मी पण आनंदात आणि रिक्षावाले काका पण आनंदात...
थोड्या वेळासाठी दोघेही आपापल्या मनातली काळजी विसरलो.
-----------------------------------------------
अशा प्रसंगातून मी काय शिकलो-
काही व्यक्ती आपल्या आयुष्यात खूपच क्षणिक कालावधीसाठी अवतरतात आणि खूप सारा आनंद देऊन जातात; ज्याच्याविषयी आपण कधी विचारही केलेला नसतो.
अनेक वेळेस असही होत की कोणीतरी आपल्याला आनंद देण्याचा प्रयत्न करत असतो पण तो आपण स्विकारतच नाही; आपण आपल्याच ATTITUDE, EGO, चिंता, काळजी... यामध्ये अडकून पडलेलो असतो.या सर्वांतून आपण बाहेर पडायला पाहिजे - जगाला काहीतरी दिलं पाहिजे, जगाकडून काहीतरी घेतल पाहिजे, शिकल पाहिजे.
खूप वेळेस आपलं आयुष्य मोठमोठ्या दुःखाने,संकटाने भरल्यासारखं वाटत; अशा वेळेस आयुष्याचा कंटाळाही यायला लागतो, त्रास व्हायला लागतो. पण हे सर्व विचार बाजूला ठेवून त्या प्रसंगाना, संकटांना बदलण्यासाठी स्वतःला आव्हान केलं पाहिजे, स्वतःत प्रेरणा निर्माण केली पाहिजे.
मग राहणार ना नेहमी आनंदात?
------------------------------------------------
विचारमालेविषयी अधिक जाणून घ्या:- विचारमाला
5 comments:
अतिशय सुंदर लेख 👍❤प्रत्येक परिस्थितीतुन मार्ग काढण्याचा एक मार्ग म्हणजे हास्य.. 🙂
Thanks❤️
मी पण वाचून हसलो.अशीच लेखनाची धार तिखट होत जावो
नक्कीच 🙂
😊🤗खूप सुंदर लेख....आहे
Post a Comment