देशात अनेक अनपेक्षित घटना घडत असतात. जसे की:- दुष्काळ, पूर, उपासमार, बालगुन्हेगारी, दहशतवाद, महिलांवरील अत्याचार, इ. आणि त्या विशिष्ट कालावधीपूरतीच त्यांच्या विरोधात आंदोलने, प्रदर्शने, मुकमोर्चे निघतात. हे सर्व तेंव्हाच होते जेंव्हा एखादी घटना घडते, त्यानंतर त्या विषयी कोणीही बोलत नाही, तशा घटना घडू नयेत म्हणून नंतर कोणीही उपाययोजनांचा विचार करीत नाही. अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. याचा अर्थ; शरीराला एखाद्या रोगाने ग्रासल्या नंतरच त्यावर औषोधोपचार करायचा आणि एकदा का रोग बरा झाला की शरीराकडे दुर्लक्ष करायचा असा होतो, नाही का?
आपण सुजाण नागरीक आहोत. भारतासारख्या लोकशाही देशाला कोण-कोणत्या समस्या भेडसावू शकतात याचा अंदाज घेऊन ती समस्याच निर्माण होऊ नये म्हणून सातत्याने वैयक्तिक किंवा सामुहिक पातळीवर कार्य करत राहायला पाहिजे. असे करत असताना, जरी एखादी घटना अनावधानाने घडली तरी त्यातून खूप लवकर आपण बाऊंस बॅक घेऊ शकतो कारण त्या वेळेला घटनेची तीव्रता कमी असेल.
थोडस त्याही पुढे जाऊन सांगायच म्हणजे; प्रत्येक अनपेक्षित घटना ही संकट नसते तर ते आपल्याद्वारे झालेल्या किंवा न झालेल्या कार्याचा परिणाम असतो. उदाहरनात- वाहतूक नियम न पाळल्यामुळे होणारे अपघात, मोबाइल सारख्या वाढत्या तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे होणारे शारीरिक किंवा मानसिक परिणाम, वृक्षतोडीमुळे होणारी वातावरणातील तापमानाची वाढ, उपासमारी, प्रदूषण या सर्वांना आपल्यालाच तोंड द्यावे लागते कारण हे सर्व आपल्यामुळेच निर्माण होत आहे.
देशापुढील प्रत्येक संकटाच्या बाबतीत प्रशासन नेहमीच सतर्क असायला पाहिजे त्याचबरोबर नागरिक म्हणून आपणही जागृत असायला पाहिजे. प्रत्येक कार्य एकट्यामुळे पूर्णत्वास जात नाही पण देशाला विकसित राष्ट्र पाहण्याची स्वप्न बाळगणाऱ्या सर्वांनी जर चांगल्या कार्याची सुरुवात (नेहमीसाठीच) वैयक्तिक पातळीवरून केली तर आपला देश नक्कीच प्रगत राष्ट्र बनेल.
(टीप:- काही चूक आढळल्यास किंवा काही सुचवायचं असल्यास नक्की सुचवा, स्वीकारलं जाईल.
E-MAIL ID:- ytingale@gmail.com)
No comments:
Post a Comment