तो माझ्यावर आक्रमण करण्याआधीच मी मास्क लावून घेतलो आणि तो खाली पडला. मी हळूच त्याला झाडाच्या पानावर घेऊन पुण्याच्या पाउलवाटेवरील आसनावर आसनस्थ झालो आणि त्याला लाडिगोडी लावून त्याच्याशी मैत्री केलो.
तो सांगत होता की त्याच आयुष्य खूप छोटस असतं, अगदी काही तासांच; पण या काही तासांच्या आयुष्यात तो सतत आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा पण जेंव्हा त्याचा रस्ता आणि राहण्याचं ठिकाण प्राण्यातून माणवाकडे वळले तेंव्हापासून त्याला शांतपणे राहताच येत नाही. इतके मोठे संकट त्याच्या आयुष्यात कदाचित पहिल्यांदाच आले असावे.
तो पुढे बोलू लागला , अनेक गोष्टी सांगू लागला म्हणून मी त्याला थोडावेळ थांबवलं आणि बाजूच्या शॉप मध्ये जाऊन एक माझा ची बॉटल आणली, त्याच्यासाठीही एक थेंब पानावर टाकलो; तो आता काही तासांच्या आत मरणार होता तरीही तो खूप शांत आणि समाधान दिसत होता.
E-MAIL ID:- ytingale@gmail.com)
तो सांगत होता की त्याच आयुष्य खूप छोटस असतं, अगदी काही तासांच; पण या काही तासांच्या आयुष्यात तो सतत आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा पण जेंव्हा त्याचा रस्ता आणि राहण्याचं ठिकाण प्राण्यातून माणवाकडे वळले तेंव्हापासून त्याला शांतपणे राहताच येत नाही. इतके मोठे संकट त्याच्या आयुष्यात कदाचित पहिल्यांदाच आले असावे.
तो पुढे बोलू लागला , अनेक गोष्टी सांगू लागला म्हणून मी त्याला थोडावेळ थांबवलं आणि बाजूच्या शॉप मध्ये जाऊन एक माझा ची बॉटल आणली, त्याच्यासाठीही एक थेंब पानावर टाकलो; तो आता काही तासांच्या आत मरणार होता तरीही तो खूप शांत आणि समाधान दिसत होता.
मी त्याला विचारलो - "हे कोरोना, तुझा जन्म झाल्यानंतर अगदी काही तासांच्या आत तू मरणार आहेस याची भीती नाही का वाटत तुला?" तो नकळत माझ्याकडे पाहिला, हसला आणि बोलू लागला, " हो यशवंता, मला माहित आहे की मी अगदी काही तासांच्या आत मरणार आहे पण मला हे नक्की माहीत नसते की - मी कोणत्या तासाच्या-कितव्या मिनिटाच्या-कितव्या सेकंदाला मरणार आहे; त्यामुळे मी त्याची म्हणजे मरणाची वाट बघत बसत नाही. तितक्याच काहीश्या तासातच मी खूप आनंदी राहतो, माझ्या भावंडांबरोबर खेळतो, बागडतो; तेवढ्याच कालावधीत माझ्या काही भावंडांचा मृत्यू होतो पण काही नवीन भावंडे लगेच जन्माला येतात; त्यामुळे काहीतरी गमावल्याच दुःख न बाळगता काहीतरी मिळवल्याचा आनंद साजरा करतो."
मी कोरोनाचे हे शब्द ऐकून थक्क झालो आणि शांत बसलो तेवढ्यात तो ओरडला ' यशवंता, मला परत भूख लागली' पण या वेळेस तो माझा पिण्यास नकार देत होता म्हणून मी आजूबाजूला पाहिलं तर पाऊलवाटेवर एक कोपऱ्यात अनेक मुंग्या आणि घरमाश्या एका उंदराच भक्षण करीत होते, कदाचित मांजराने अर्ध खाऊन टाकलं असेल. त्यातला थोडासा भाग लाकडाच्या छोट्याशा तुकड्याने घेऊन कोरोनाच्या पानावर आणून टाकलो. मग तो त्याच्यावर ताव मारू लागला आणि मी माझा पिऊ लागलो.
तेवढ्यात तो माझ्याकडे पाहून विचारला, "यशवंता, तुम्ही मानव खूपच डरपोक दिसताय मला, मी जेव्हापासून तुमच्या शरीरात आसरा घेतलो तेंव्हापासून तुम्हां मानवांची धांदलच उडाली. तुम्ही मृत्यूला घाबरता का रे?" "छे, नाही रे, आम्ही तर मृत्यू येण्याआधीच दोराने फाशी घेऊन, विष पिऊन, दारू, सिगारेट, तंबाखूच्या आहारी जाऊन मरण येण्याआधीच मरतो पण प्रत्येकाची कारणे वेगवेगळी असतात" माझ्या तोंडातून सर्रकन उत्तर निघालं.
"व्वा, तुमच्याकडे तर मरणाचे खूपच व्हरायटीझ आहेत रे, सेलेक्ट करा आणि मरा" कोरोना हसू लागला.
"बरं, मला सांग कोरोना, तुला अचानक आमच्या शरीरात आसरा घेण्याची आणि आम्हाला जीवे मारण्याची आवड का निर्माण झाली?" "हे बघ यशवंता, असा हा जीवे मारण्याचा गुन्हा माझ्यावर लादू नकोस, मला काहीएक आनंद मिळत नाही तुम्हाला मारून" "मग..." मला थांबवत तो एकदम शांतपणे बोलला, "मला सांग यशवंता, जर तुझे आश्रयस्थान सातत्याने कोणीतरी नष्ट करत असेल तर तू काय करशील? मला माहित आहे की आपण सहनशील असायला पाहिजे पण सहनशीलतेलाही काही मर्यादा असतात रे. तुम्हा मानवालाच - काय खायला पाहिजे, कस खायला पाहिजे, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा की नाही हे समजत नसेल तर त्यात आमचा काहीएक दोष नाही. तुम्ही जिथे जिथे अस्वछता करता तिथे तिथे आम्ही विषाणू निर्माण होतो; अगदी तुम्ही जिथे थुंकता तेथेही आम्ही विषाणू, जिवाणू जन्म घेतो. 'जिथे अस्वछता, तिथे आम्ही' हा तर आमचा मूलमंत्र आहे, मित्रा" दोघेही शांत आणि स्तब्ध बसलो. माझ्या तोंडातून शब्द फुटेनात हे पाहून तोच पुढे बोलू लागला,
"तुम्ही मानव सर्वशक्तीमान आहात पण तुम्ही प्रकृतीच्या विरोधात कार्य करत असाल, प्रकृतीला त्रास देत असाल तर ती तुमच्यापेक्षाही बलाढ्य शक्ती निर्माण करू शकते. भूकंप, लाटा, ज्वालामुखी, त्सुनामी ही त्याचीच तर उदाहरणे आहेत. आम्ही विषाणू तुमचा अंत करणार नाही तर तुम्ही स्वतःच तुमच्या शेवटाची कट्यार धारदार करत आहात, ती कट्यारच तुमचा अंत करेल"
बस ना यार कोरोना, इतकी दूषणे नको ना देऊ आम्हाला. तुला माहीत आहे का आम्ही किती हुशार आहोत?, "हो, माहीत आहे, येत्या काही दिवसात तुम्ही एखादी लस तयार करून तुम्ही आमचा खात्मा कराल , त्याही आधी वाढत्या तापमानामुळे आमचं बरचस प्रमाण कमी होईलच. आणि तुमच्या हुशारीच एक उदाहरण म्हणजे आम्ही चीनमधून बाहेर पडून तुमच्या देशात येण्यापूर्वीच तुम्ही आमच्यावर नियंत्रण आणण्याचे उपाय शोधून काढला, रे" दोघेही हसु लागलो, "बस ना यार कशाला चेष्टा करतोस, आणि तू विना पासपोर्ट विना व्हिसा च एकदम वेगात पृथ्वीवर प्रवास केला रे, ही पण आश्चर्यकारक बाब आहे, नाही का?" परत दोघात हास्य पेटला.
त्यानंतर काही वेळासाठी दोघेही पाऊलवाटेवरील आसनावर निवांत पहुडलो. थोड्यावेळाने कोरोना पुटपुटला,"यशवंत, तुझं जस नाव आहे तस मलापण तुझ्या आवडीच एखाद नाव देना"
" नको मित्रा, नाव आलं की आडनाव येते; आडनाव आलं की जात येते; जात आली की धर्म येतो; धर्म आला की बंधने आणि अत्याचार येतात" मी बोललो.
तेवढ्यात वाऱ्याची एक मोठी झुळूक आली आणि कोरोनाला त्याच्या पाणासोबत घेऊन गेली आणि माझा एक मित्र तीथेच हरवला.
कदाचित आतापर्यंत तो मृत्यूही पावला असेल.
कोरोनाने मला अनेक गोष्टी शिकवल्या त्या म्हणजे:-
1) तू कितीही शक्तिशाली, कितीही हुशार असलास तरीही तुझ्यापेक्षा बलाढ्य आणि हुशार जीव या भूतलावर अस्तित्व करत आहे.
2) तुझा अंत तुझ्याच कार्यामुळे होऊ शकतो म्हणून आताच सावर.
(टीप:- कोरोनाबद्दल चुकीची अफवा पसरवण्याचा लेखकाचा उद्देश नाही. काही चूक आढळल्यास किंवा काही सुचवायचं असल्यास नक्की सुचवा, स्वीकारलं जाईल.
E-MAIL ID:- ytingale@gmail.com)
No comments:
Post a Comment