टीका करावी पण अपुऱ्या ज्ञानाने नको,
उणिवा दर्शवावे पण मनस्ताप होईल असे नको,
मार्ग सुचवावे पण अंमलबजावणीची सक्ती नको,
परखड बोलावे पण असत्य नको.
स्वतःची बढाई मारण्यासाठी, स्वतःचे ज्ञान दर्शवण्यासाठी टीका नसावी, टीकेला पण काही अर्थ असावा.
टीका एकटी नसावी, गुणगान ही असाव कारण कोणतीही गोष्ट पूर्णपणे वाईट नसते.
थोडक्यात ,
भाष्य टीकात्मक नसाव, समजून सांगणार असावं.
आणि हं,
भाष्य करताना सातत्याने टिकाच करणे थोरांचे लक्षण नाही हेही लक्षात असाव.
No comments:
Post a Comment