गंगाधर भावा,
भावा सगळ्यात आधी मी मनापासून माफी मागतो , काल तुझा Birthday होता आणि मी तो विसरलो,
माझ्या लक्षातच नाही की तुझा Birthday वैगेरे होता .. जर काल मी Insta open केलो नसतो तर.. माझ्या मोबाइल मधून नेहमीप्रमाणे Insta Uninstall केलो असतो तर, Insta story पाहिलोच नसतो तर, कदाचित मला समजल पण नसत की काल तुझा birthday होता ..
इतके वर्ष, जेंव्हापण तुझा किंवा माझा Birthday असायचा, तेव्हा जवळपास 10 दिवस आधीपासून आपण एकमेकांना Wish करायचो, रात्रीचे जवळपास 1 वाजत आहेत आणि माझ डोक याच विचाराने सुन्न आहे की मी कसकाय विसरू शकतो .. माझ्या सगळ्यात जास्त जिगरी मित्राचा Birthday ..
आयुष्याच्या कोणत्या Stage वर आज आपण येऊन उभे आहोत मित्रा?.. कुठूनतरी निघण्यासाठी खूप प्रयत्न करत होतो आपण , आणि आज कुठेतरी येऊन परत अडकलो की काय अस वाटत आहे .. कुठे आहेत ते आनंदाचे क्षण, हेच आहेत का ते आनंदाचे क्षण, हेच आहे का ते विसरभोळ आयुष्य जे आपल्याला आनंदात जगायच आहे.. अस सांगितल जात की आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदात जगाव..
काय हे खरंच शक्य आहे ????
हो शक्य आहे, पण तेंव्हाच जेंव्हा आपण आज या क्षणात जगायला शिकलो तरच.. पण हे शिकणच सर्वात अवघड आहे आणि बाकी सर्व प्रश्नांचे घोडे इथेच अडतात .. कारण .. जाऊदे भावा मला वाटत आहे मी खूपच deep विचार करत आहे असो.. बोलू याविषयी पुन्हा कधीतरी ..
बाकी काही असो मित्रा पण आयुष्यामध्ये आपण पूर्वीपेक्षा आज एका चांगल्या स्टेज वर आहोत हे मात्र नक्की ...
आणि तुला मी नेहमी म्हणायचो ना की तुझ्यासाठी काहीही करेन मित्रा .. हे सार्वजनिक माफी पत्र त्यासाठीच ..
मी मनापासून माफी मागतो मित्रा तुला खूप उशिरा Birthday Wish केल्याबद्दल ..
नेहमी आनंदी रहा ..
तुझाच विसरभोळा, शाळेतल्या बेंच वरचा जिगरी मित्र यशवंत 😊
No comments:
Post a Comment