माझ्या गावातील, राजुरा नगरीतील सर्व सुजाण नागरिकांनो हे सार्वजनिक पत्र मी तुमच्यासाठी लिहीत आहे, गावच्या आरोग्याचा प्रश्न आहे नक्की वाचा आणि योग्य ठिकाणी हे पत्र पोहोचवा ...
सप्रेम नमस्कार, विनंती विशेष;
काही दिवसांपूर्वी तब्बेत ठीक नव्हती म्हणून गावाकडे आलो होतो. आणि पाहिल की माझ्या घरासमोरून जाणार मुख्य रस्ता (गावातील मुख्य रस्ता) हा पूर्णपणे खणून ठेवला आहे.. का..? कारण दुरुस्ती करण्यासाठी.. दुरुस्ती कधी होणार आहे .. माहिती नाही..
त्याच रस्त्यावरून दिवसरात्र 24 तास , मोठे हायवे(खाली त्या गाडीचे फोटो जोडला आहे) काळी माती वाहून नेत आहेत. आणि रस्ता ठीक नसल्यामुळे रस्त्यावरील संपूर्ण धूळ आजुबाजुच्या घरामध्ये जात आहे, ही परिस्थिति संपूर्ण गावामधून जाणाऱ्या 2 किमी अंतराच्या रस्त्यावर आहे. पण याची दाखल घ्यायला कोणीही तयार नाही ..
याच रस्त्याच्या बाजूला जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे, ज्यामध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे लहान मुले शिक्षणासाठी जातात; याच रस्त्याच्या बाजूला सरकारी आरोग्य केंद्र म्हणजेच दवाखाना आहे, ज्यात रुग्ण आपल्या तपासणीसाठी, आपल आरोग्य ठीक करण्यासाठी जातात ; पुढे गेल्यानंतर गावातील मुख्य कॉलेज देखील याच रस्त्यावर आहे.
तसेच, गावातील मुख्य दुकाने आणि हॉटेल याच रस्त्याच्या दुतर्फा आहेत. याच रस्त्याच्या दुतर्फा गावातील जवळपास 40 % जनता वास्तव्य करते. गावातील लहान लेकर याच रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या अंगणात, मैदानात खेळतात; खूप सारे आजी आजोबा देखील त्यांच म्हातारपण याच रस्त्याच्या बाजूला घालवत आहेत ते देखील आजारी असू शकतात; काही माता-भगिनी गरोदर देखील असू शकतात; हाच मुख्य रस्ता असल्यामुळे गावातील पदयात्री पण याचाच उपयोग पायवाट म्हणून देखील करतात. त्यामुळे भरधाव काळी माती घेऊन चालणाऱ्या या हायवा मुळे हवेत उडणाऱ्या धुळीच्या कणांचा परिणाम या सर्वांच्या आरोग्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वरूपात होत आहे. गावातील झाडे , प्राणिमात्रांवर देखील याचा परिणाम होत आहे. पण याबद्दल कोणीही पुढे होऊन बोलायला तयार नाही. हे धुळीचे कण 24 तास हवेत उडत आहेत. ते इतके जास्त आहेत की प्रत्यक्ष डोळ्यानं पाहता येत आहेत, इतकंच काय तर एखादा अंधव्यक्ति देखील सांगू शकेल की हा धुळीचा परिसर आहे. रात्री झोपेत श्वसनामध्ये जाणवतील इतके जास्त ते धुळीचे कण आहेत.. आणि हे सर्व 24 तास चालू आहे ते पण गावातील मुख्य रस्त्यावर ...
मी याबद्दल गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तींना बोलण्याचा प्रयत्न देखील केलो पण कुठूनही हवा तसा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाहीये.
मी मान्य करतो की कुठलातरी विकास करण्यासाठी ही काळी माती मोठ्या हायवे गाडयानी वाहून नेली जात असेल, पण कुठलातरी विकास हा कुठल्यातरी लोकांच्या आरोग्याला दुर्लक्षित करून करणे हे योग्य आहे का.. ? कोणताही विकास हा त्या परिसरातील लोकांच्या आरोग्याच्या मोबदल्यात मिळणार असेल तर हा विकास खरंच हवा आहे का ..? आणि कुणाला ?
गावातील सुजाण नागरिकांनो , आपण फक्त गावची जत्रा, किंवा जयंती साजरी करण्यासाठी किंवा गावातील मतदानाच्या दिवशीच एकत्रीत यायच काय ..? मग गावात समस्या निर्माण झाल्यावर कोण एकत्रीत येणार ..? याबद्दल कोण बोलणार ..? विचार करा.
जिथे समस्या आहे तिथे उपाय देखील असतोच, मी केलेल्या विचारानुसार पुढील उपाय मला सोईस्कर वाटतात.. फक्त अमलबजावणी कोण करणार हे मी माझ्या प्रिय गावकऱ्यावर सोडतो..
* रस्ता लगेच दुरुस्त करणे शक्य नसेल तर - प्रत्येक 2 ते 3 तासानंतर त्या 2 किमी रस्त्यावर टॅंकरणे पानी शिंपडावे आणि गावाजवळ आल्यानंतर मोठ्या गाड्यांचा वेग प्रती तास 5 किमी पेक्षाही कमी असावा,
* गाडी पूर्ण मातीने न भरता थोडीशी कमी भरावी म्हणजे वेगात ती रस्त्यावर सांडणार नाही अन धुळीचे कण हवेत उडणार नाहीत.
* यापेक्षाही उत्तम उपाय आपल्याकडे असतील तर त्याचा वापर करावा पण हे होणारे वायूचे प्रदूषण टाळावे.
मी आज आपल्या गावातून माझ्या नोकरीच्या गावी जात आहे, पण अपेक्षा करतो की माझ हे पत्र योग्य व्यक्तिपर्यंत/ साहेबापर्यंत पोहोचेल आणि लवकरात लवकर योग्य ते उपाय यावर केला जाईल.
अपेक्षित,
यशवंत
(आपल्या गावावर प्रेम करणारा एक युवक)
धन्यवाद .. (खूपच दुखीकष्टी मनाने)